धक्कादायक! तीन लेकरांना सोडून भाच्यासोबत पळून गेली काकी; पकडले गेल्यावर झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 08:21 AM2021-06-07T08:21:32+5:302021-06-07T08:34:07+5:30

Crime News : काकीसोबत पळून जाण्याचा भाच्याचा प्लॅन फसला आणि गावकऱ्यांनी त्यांना पळून जाताना पकडलं.

aunt ran away with nephew leaving three children in godda of jharkhand | धक्कादायक! तीन लेकरांना सोडून भाच्यासोबत पळून गेली काकी; पकडले गेल्यावर झालं असं काही...

धक्कादायक! तीन लेकरांना सोडून भाच्यासोबत पळून गेली काकी; पकडले गेल्यावर झालं असं काही...

Next

नवी दिल्ली - प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. ते कुठे, कसं आणि कधी होईल हे सांगता येत नाही. प्रेम प्रकरणांची काही हटके उदाहरणं ही सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक अजब घटना झारखंडमध्ये घडली आहे. आपल्या तीन लेकरांना सोडून काकी भाच्यासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र काकीसोबत पळून जाण्याचा भाच्याचा प्लॅन फसला आणि पोलिसांनी त्यांना पकडलं. काकीने पकडले गेल्यावर पतीला सोडून भाच्यासोबत लग्न करण्याचा हट्ट धरला. मात्र कुटुंब आणि गावकरी यांच्या भीतीने भाच्याने लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या काकीने त्यांच्यावरच लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडच्या बाजीतपूर गावामध्ये राहणाऱ्या एका महिलेचं तिच्या भाच्यावर प्रेम होतं. 25 वर्षीय मुलगा त्याच्या 35 वर्षीय काकीच्या प्रेमात पडला. त्यानंतर गेले कित्येक दिवस या दोघांचं प्रेम प्रकरण सुरू होतं. महिलेला तीन लहान मुलं आहेत. एक आठवड्यापूर्वी हे दोघेही पळून गेले. त्यानंतर महिलेच्या पतीने स्थानिक पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करून आपल्या भाच्याविरोधात कारवाईची मागणी केली. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला असता त्यांना या दोघांचा शोध लागला. मोबाईल लोकेशनच्या मदतीने त्यांना दोघांची माहिती मिळाली. 

काकी आणि तिचा भाचा हे दोघेही जमालपूरमध्ये लपून बसले होते. पोलिसांनी या दोघांना शोधून काढलं आणि समजावून घरी परत आणलं. घरी परत आल्यानंतर महिला पतीला सोडून भाच्यासोबत लग्न करण्यासाठी अडून बसली. तिने आपल्या प्रेम प्रकरणाची कुटुंबीयांना माहिती दिली. मात्र नातेवाईक आणि गावकऱ्यांच्या भीतीमुळे भाच्याने लग्न करण्यास नकार दिला. तसेच काकीसोबत कोणतेही संबंध नसल्याचं म्हटलं. हे ऐकल्यावर काकी संतप्त झाली. तिने भाच्यावरच फसवणुकीचा आणि लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केला. तसेच यानेच आपल्याला पळून नेलं असं देखील म्हटलं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

बापरे! कोरोनामुळे पतीचा मृत्यू, धक्क्याने पत्नीची जाळून घेत घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या

कोरोनामुळे अनेक कुटुंबाची वाताहत झाली आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. हसतं-खेळतं कुटुंब कोरोनामुळे उद्ध्वस्त झालं आहे. कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने पत्नीने देखील आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने नैराश्यात असलेल्या पत्नीने जाळून घेत घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरमधील पंजाबी कॉलनीत ही भयंकर घटना घडली आहे. साधारण एक महिन्यापूर्वी महिलेच्या पतीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर गेले कित्येक दिवस महिला नैराश्यात होती. पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने तिने आता टोकाचं पाऊल उचललं आहे. स्वत: ला जाळून घेतलं आणि घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली. 

Web Title: aunt ran away with nephew leaving three children in godda of jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.