शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
स्मरण दिन अन् गुरुवार, सलग २ दिवस सेवा करायची सुवर्ण संधी; स्वामी महाराज शुभ तेच होईल!
7
स्वामी समर्थ पुण्यतिथी: 'स्वामी' म्हणजे नक्की कोण? 'या' शब्दाचा गर्भितार्थ तुम्हाला माहीत होता का?
8
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
9
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
10
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
11
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
12
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
13
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
14
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
15
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
16
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
17
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
18
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
19
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
20
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
Daily Top 2Weekly Top 5

मार्केटयार्ड येथील दिवाणजीला लुटणाऱ्या तीन जणांना अटक, दोघे सराईत गुन्हेगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 18:26 IST

तीन दिवस दिवाणजीवर पाळत ठेवून रेकी केली.

ठळक मुद्देगुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई

पुणे : व्यापारातून जमा झालेली रोकड बॅंकेत जमा भरण्यासाठी निघालेल्या दिवाणजीला रस्त्यात गाठून राॅडने हल्ला करन लुटणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पकडले. थापा उर्फ विकास गोविंद कांबळे( वय २१, रा. लोहियानगर), मयुर सुरेश जाधव (वय १९, रा. जनता वसाहत), अक्षय रमेश नवले ( वय१९, रा. जनता वसाहत) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. यातील कांबळे आणि नवले हे दोघे सराईत गुन्हेगार आहेत.

यावेळी आरोपींच्या ताब्यातून चोरी केलेली रोकड व दुचाकी असा, ३ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी त्यांना मार्केट यार्डपोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.याबाबत दिवाणजी सुमंतीलाल चंदनलाल ओस्तवाल (वय ६९, रा. गंगानगर, आकुर्डी प्राधिकरण) यांनी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याच्या अनुषगाने तपास करत असताना, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींची ओळख पटवली असता, कर्मचारी रमेश चौधर यांना तिघे आरोपी रामटेकडी परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक दत्ताजी मोहिते, हवालदार उदय काळभोर, चिखले, गरुड, येलपल्ले यांनी सापळा रचून तिघांना अटक केली

तीन दिवस केली होती रेकी....

थापा उर्फ विकास कांबळे हा सराईत गुन्हेगार आहे. दोन महिन्यापुर्वी तो तेल घेण्यासाठी दुकानात आला होता. त्यावेळी त्याने दिवसभराचा दुकानातील गल्ला पाहिला होता. त्यामुळे त्याला दिवाणजी कधी गल्ल्यातून पैसे जमा करतात आणि बॅंकेत भरायला जातात याची माहिती होती. आरोपींनी तीन दिवस दिवाणजीवर पाळत ठेवून रेकी केली. आदल्या दिवशी जमा झाले मात्र दिवाणजी पैसे भरण्यासाठी गेले नाहीत. त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी तिघांनी पाहणी केली. त्यावेळी ते बॅगेत पैसे घेऊन निघालेले दिसले. त्यानुसार वाटेत आडवे थांबून डोक्यात राॅडने मारहाण करत त्यांच्याकडील रोकड जबरदस्तीने हिसकावून आरोपींनी पळ काढला होता. 

ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली.

टॅग्स :market yardमार्केट यार्डThiefचोरtheftचोरीPoliceपोलिसArrestअटक