Shree Swami Samarth Maharaj Seva: श्री स्वामी समर्थ या नावाचा केवळ उच्चार केला, तरी मनात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो. सकारात्मकता मिळते. वेगळीच ऊर्जा संचारते. प्रेरणा मिळते. श्री स्वामी समर्थांचे श्रेष्ठत्व वर्णन करण्यास कोणत्याही भाषेतील शब्द थिटे पडतात. प्रत्यक्ष परब्रह्माला शब्दात कसे पकडणार? श्री स्वामी समर्थ हे आज लक्षावधी आर्त, जिज्ञासूंचे आश्रयस्थान आहे. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील, हेही कोणी सांगू शकत नाही. परंतु, जेव्हा कृपा होते, शुभाशिर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते. अशा या श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन बुधवार, १५ एप्रिल २०२६ रोजी आहे. त्यानंतर गुरुवार आहे. गुरुवारी स्वामींचे आवर्जून पूजन केले जाते. त्यामुळे बुधवार आणि गुरुवार हे सलग दोन दिवस स्वामींची सेवा करून शुभाशिर्वाद प्राप्त करण्याची शुभ संधी प्राप्त झाली आहे.
चैत्र वद्य त्रयोदशीला श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या स्मरण दिनी स्वामींची शिकवण, उपदेश, स्वामी विचार यांचे स्मरण करून स्वामींच्या चरणी विशेष सेवा अर्पण केली जाते. स्वामींची कृपा लाभावी, यासाठी प्रत्येक जण विशेष प्रयत्न करत असतो. श्री स्वामी समर्थांचे माहात्म्य आणि त्यांचे चरित्र अनेकांनी अनेक प्रकारे रंगविले असले तरी त्याचा जो अधिक विचार करावा, तो त्याचे अनंत नवे पैलू आपल्या लक्षात येतात. खरोखरच अद्भूताचा अनुभव येतो. सूर्य किरण जसे मोजता येत नाही, सागराच्या लाटांची मोजदाद करता येत नाही, त्याचप्रमाणे स्वामींच्या चरित्राचा थांगच लागत नाही, असे अनेक जण सांगतात.
स्मरण दिन अन् गुरुवार, सलग २ दिवस सेवा करायची सुवर्ण संधी
- बुधवारी स्वामींचा स्मरण दिन असल्याने शक्य असेल तर आवर्जून स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घ्यावे.
- गुरुवारीही हजारो भाविक नित्य नियमाने स्वामींच्या मठात जातात. याही गुरुवारी तो नियम चुकवू नये.
- स्मरण दिनी स्वामींचे विशेष पूजन, नामस्मरण, मंत्रांचे जप करावेत.
- गुरुवारी आपली नित्याची सेवा सुरूच ठेवावी.
- स्मरण दिनी पिवळ्या रंगाची फुले, पिवळ्या रंगाची मिठाई, स्वामींच्या आवडत्या गोष्टी अर्पण करावी.
- गुरुवारीही पिवळी फुले, पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी.
- स्मरण दिन आणि गुरुवारी आठवणीने प्रभावी तारक मंत्र म्हणावा. शक्य असेल तर ११ वेळा, २१ वेळा पारायण करावे.
- निस्वार्थ नामस्मरणामुळे स्वामी भक्ताच्या हाकेला धावून येतात आणि त्याची सत्कार्य पूर्ण करतात, असा अनेकांचा अनुभव असल्याचे सांगितले जाते.
- स्वामी नक्कीच शुभ करतील, अशी अढळ श्रद्धा कायम ठेवा. स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका.
- स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण, स्वामी सेवा करत राहा.
॥ श्री स्वामी समर्थ ॥
Web Summary : Devotees get a chance for Swami Seva on Smaran Din and Thursday. Visit the math, offer yellow flowers, chant mantras, and maintain unwavering faith for blessings.
Web Summary : स्मरण दिन और गुरुवार को स्वामी सेवा का अवसर। मठ पर जाएं, पीले फूल चढ़ाएं, मंत्रों का जाप करें और आशीर्वाद के लिए अटूट विश्वास बनाए रखें।