शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीकडे पाहून हस्तमैथुन करणाऱ्या रिक्षाचालकास पोलिसांनी ठोकल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 19:09 IST

आरोपीविरोधात मुंबईत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत मारामारी, विनयभंगाचे गुन्हे नोंद असल्याचे आढळून आले आहे. 

ठळक मुद्देहे पथक रिक्षाचालकाचा रिक्षा पार्किंग स्टॅण्ड, बसथांबे आदी ठिकाणी शोध घेत होते. आरोपी रिक्षाचालकाने गुन्हा कबूल केला असून तो भाड्याने रिक्षा शिफ्टवर घेऊन चालवतो.

मुंबई - सार्वजनिक ठिकाणी महिलांशी असभ्य वर्तन करून अश्लील चाळे करणाऱ्या विकृत रिक्षाचालकास गुन्हे शाखेच्या कक्ष ११ ने अटक केली आहे. १ सप्टेंबरला एक तरुणी नेहमीप्रमाणे ऑफिसहून घराकडे जात असताना रात्री ११.३० वाजताच्या सुमारास मालाड पश्चिमेकडील चिंचोली बंदर बस स्टॉपजवळ वाहनांची वाट पाहत होती. त्यावेळी त्याठिकाणी एक अज्ञात रिक्षाचालक आला आणि त्या तरुणीस रिक्षात बसण्यास सांगू लागला. तरुणी रिक्षाचालकाकडे पाहत असताना त्याने अश्लील हावभाव करून हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. या रिक्षाचालकांच्या कृत्याने तरुणी घाबरून गेली गेली आणि तिने तिचा मोबाईल काढून रिक्षाचालकांचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोवर रिक्षाचालकाने घटनस्थळाहून पळ काढला होता. याबाबत तरुणीने बांगूर नगर पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालकाविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या विकृत रक्षाचालकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेऊन प्रतिबंधात्मक उपाय करण्याच्या सूचना गुन्हे शाखेच्या वरिष्ठांनी वेळोवेळी गुन्हे शाखा कक्षांना दिल्या आहेत. या अनुषंगाने कक्ष - ११ ने अज्ञात रिक्षाचालकाला शोधण्यास पोलिसांचे पथक तयार केले. हे पथक रिक्षाचालकाचा रिक्षा पार्किंग स्टॅण्ड, बसथांबे आदी ठिकाणी शोध घेत होते. तसेच घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणेचे फुटेजची तपासणी करण्यात आली. फिर्यादी तरुणीने आरोपी रिक्षाचालकाने केलेल्या वर्णनानुसार मालाड, गोरेगाव, मालवणी, गणपत पाटील नगर, दहिसर चेकनाका परिसरात रिक्षाचालकाचा आणि रिक्षेचा पोलीस शोध घेत होते. ११ सप्टेंबरला बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून कक्ष - ११ ने मालाड पश्चिम येथील मालवणी परिसरातून ३२ वर्षीय आरोपी रिक्षाचालकाला ताब्यात घेतले. आरोपी रिक्षाचालकाने गुन्हा कबूल केला असून तो भाड्याने रिक्षा शिफ्टवर घेऊन चालवतो. या आरोपीविरोधात मुंबईत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत मारामारी, विनयभंगाचे गुन्हे नोंद असल्याचे आढळून आले आहे. 

टॅग्स :MolestationविनयभंगPoliceपोलिसArrestअटकauto rickshawऑटो रिक्षा