शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
4
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
5
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
6
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
9
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
10
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
11
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
13
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
14
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
15
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
16
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
17
Shyam Nath Goswami : Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
18
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
19
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
20
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयाने सुखी संसाराचा थरारक शेवट; क्रूर पतीने पत्नीला कायमचे संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 10:27 IST

ऋषिकेशने आपल्या हातातील जड अशा स्टीलच्या कड्याने प्रियांशीच्या कपाळावर, चेहऱ्यावर आणि छातीवर प्रहार  केले.

​​अमरावती - संशयाचे भूत मनावर स्वार झाले की माणूस किती क्रूर होऊ शकतो, याचा प्रत्यय चांदूर बाजार तालुक्यात आला आहे. चारित्र्यावर संशय घेऊन एका नराधम पतीने आपल्या २४ वर्षीय पत्नीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चांदूर बाजार पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.

ही घटना ४ मे रोजी सायंकाळी ५:३५ वाजताच्या सुमारास  जवळा शहापूर येथे घडली. अवघ्या काही तासांतच तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी मध्यरात्री ११:३७ वाजता याप्रकरणी गुन्हा दाखल केला आणि अवघ्या काही मिनिटांतच म्हणजे ५ मे रोजी पहाटे १२:१८ वाजता आरोपीला अटक करण्यात आली.पोलीस रिपोर्टनुसार, आरोपी ऋषिकेश ऊर्फ सनी श्रीकृष्ण आठवले (वय २६ वर्ष, रा. जवळा शहापूर) याने आपली पत्नी प्रियांशी (वय २४ वर्ष) हिच्या चारित्र्यावर संशय घेतला. याच रागातून त्याने प्रियांशीवर हल्ला चढवला.

ऋषिकेशने आपल्या हातातील जड अशा स्टीलच्या कड्याने प्रियांशीच्या कपाळावर, चेहऱ्यावर आणि छातीवर प्रहार  केले. इतकेच नाही तर तिला लाथाबुक्क्यांनीही बेदम मारहाण केली. या गंभीर दुखापतीमुळे प्रियांशीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील प्रवीण पाथरे यांनी तत्काळ तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने फॉरेन्सिक व्हॅन पाचारण करून घटनास्थळाचा पंचनामा केला. उपविभागीय पोलीस अधिकारी शुभम कुमार आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक सागर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदूर बाजार पोलीस स्टेशनचे अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Doubt Kills: Husband Murders Wife Over Suspicion in Amravati

Web Summary : In Amravati, a husband brutally murdered his 24-year-old wife, Priyanshi, fueled by suspicion of infidelity. Rishikesh attacked her with a steel bracelet, leading to her immediate death. Police arrested the accused, and investigations are underway.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी