चारित्र्याच्या संशयाने सुखी संसाराचा थरारक शेवट; क्रूर पतीने पत्नीला कायमचे संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 10:27 IST2026-05-05T10:27:05+5:302026-05-05T10:27:05+5:30

ऋषिकेशने आपल्या हातातील जड अशा स्टीलच्या कड्याने प्रियांशीच्या कपाळावर, चेहऱ्यावर आणि छातीवर प्रहार  केले.

An incident occurred in Amravati where a husband killed his wife over suspicions regarding her character | चारित्र्याच्या संशयाने सुखी संसाराचा थरारक शेवट; क्रूर पतीने पत्नीला कायमचे संपवले

चारित्र्याच्या संशयाने सुखी संसाराचा थरारक शेवट; क्रूर पतीने पत्नीला कायमचे संपवले

​​अमरावती - संशयाचे भूत मनावर स्वार झाले की माणूस किती क्रूर होऊ शकतो, याचा प्रत्यय चांदूर बाजार तालुक्यात आला आहे. चारित्र्यावर संशय घेऊन एका नराधम पतीने आपल्या २४ वर्षीय पत्नीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चांदूर बाजार पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.

ही घटना ४ मे रोजी सायंकाळी ५:३५ वाजताच्या सुमारास  जवळा शहापूर येथे घडली. अवघ्या काही तासांतच तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी मध्यरात्री ११:३७ वाजता याप्रकरणी गुन्हा दाखल केला आणि अवघ्या काही मिनिटांतच म्हणजे ५ मे रोजी पहाटे १२:१८ वाजता आरोपीला अटक करण्यात आली.
पोलीस रिपोर्टनुसार, आरोपी ऋषिकेश ऊर्फ सनी श्रीकृष्ण आठवले (वय २६ वर्ष, रा. जवळा शहापूर) याने आपली पत्नी प्रियांशी (वय २४ वर्ष) हिच्या चारित्र्यावर संशय घेतला. याच रागातून त्याने प्रियांशीवर हल्ला चढवला.

ऋषिकेशने आपल्या हातातील जड अशा स्टीलच्या कड्याने प्रियांशीच्या कपाळावर, चेहऱ्यावर आणि छातीवर प्रहार  केले. इतकेच नाही तर तिला लाथाबुक्क्यांनीही बेदम मारहाण केली. या गंभीर दुखापतीमुळे प्रियांशीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील प्रवीण पाथरे यांनी तत्काळ तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने फॉरेन्सिक व्हॅन पाचारण करून घटनास्थळाचा पंचनामा केला. उपविभागीय पोलीस अधिकारी शुभम कुमार आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक सागर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदूर बाजार पोलीस स्टेशनचे अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Web Title : शक ने ली जान: अमरावती में पति ने पत्नी की हत्या की

Web Summary : अमरावती में, एक पति ने व्यभिचार के संदेह में अपनी 24 वर्षीय पत्नी, प्रियांशी की बेरहमी से हत्या कर दी। ऋषिकेश ने उस पर स्टील के कड़े से हमला किया, जिससे उसकी तत्काल मौत हो गई। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है, और जांच जारी है।

Web Title : Doubt Kills: Husband Murders Wife Over Suspicion in Amravati

Web Summary : In Amravati, a husband brutally murdered his 24-year-old wife, Priyanshi, fueled by suspicion of infidelity. Rishikesh attacked her with a steel bracelet, leading to her immediate death. Police arrested the accused, and investigations are underway.