शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 23:59 IST

अपहरण झालेल्या व्यक्तीकडून पोलिसांनी समजून घेतला घटनाक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर: वाशिम येथून एका ज्येष्ठ व्यक्तीचे अपहरण करून अहिल्यानगरमार्गे पुण्याच्या दिशेने जात असलेल्या आरोपींचा पाठलाग करत नगर पोलिसांनी नागापूर येथील पुलावर रात्री दहा वाजेच्या सुमारास मोठ्या शिताफीने अटक केली. पोलीस व आरोपींमध्ये झटापट झाल्याने नागापूर पूलावर बराच वेळ हा थरार रंगला होता.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, वाशिम येथून एका ज्येष्ठ व्यक्तीचे चार जणांनी अपहरण केले. ते छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर मार्गे पुण्याला जात आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पथकाने अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर रोडवरील शेंडी बायपास चौकात सापळा रचला आणि तिथून चारचाकीचा पाठलाग केला. आरोपींना पोलीस आपला पाठलाग करत असल्याची कुणकुण लागली. त्यांनी भरधाव कार चालवत पुण्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पुढे अहिल्यानगर- मनमाड रोडवरील दुध डेअरी चौकात एमआयडीसी पोलिसांनीही सापळा रचला होता. आरोपींनी एमआयडीसी पोलिसांना हुलकावणी देत त्यांची कार नगरच्या दिशेने वळवली.

एमआयडीसी पोलिसांनी आरोपींच्या चारचाकीचा पाठलाग केला. आरोपींनी पोलिसांच्या गाडीला हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला असता, त्यांची कार नागापूर पुलावरील दुभाजकाला धडकली. यावेळी पोलिसांनी पाठलाग करत दोघा आरोपींसह चारचाकी ताब्यात घेतली. अपहरण झालेल्या व्यक्तीलाही पोलिसांनी सोबत घेतले असून त्यांच्याकडून घटनाक्रम समजून घेतला. त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. दरम्यान, वाशिम येथील पोलीसही अहिल्यानगरला दाखल झाले असून, हे प्रकरण नेमके काय आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kidnapping plot foiled in Nagar; two arrested after dramatic chase.

Web Summary : Nagar police foiled a kidnapping from Washim, arresting two near Nagapur bridge after a chase. The victim was rescued. Washim police are investigating the case.
टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगरKidnappingअपहरणPoliceपोलिसArrestअटक