शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

पुणे ग्रामीण पोलिसांची बेकायदा वाळु व्यवसायावर मोठी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 19:39 IST

वाळुने भरलेले ७ ट्रक केले जप्त

ठळक मुद्देपाऊण कोटीहुन अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त दौंड-पाटस रोडवर ट्रकने बेकायदेशीर वाळूची तस्करी होत असल्याच्या तक्रारी

बारामती : पुणे ग्रामीण पोलीसांनी बेकायदा वाळु व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. रविवारी(दि १९) रात्री पुणे- सोलापुर महामार्गासह विविध परिसरात बारामती क्राईम ब्रँचच्या पथकाने वाळुने भरलेले ७ ट्रक जप्त करण्यात आले आहेत. एकुण पाऊण कोटीहुन अधिक रकमेचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला आहे.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बारामती गोपनीय विभागाने दौंड तालुक्यातून दौंड-पाटस रोडवर ट्रकने बेकायदेशीर वाळूची तस्करी होत असल्याच्या तक्रारीवरून बारामती क्राइम ब्रँच प्रमुख पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व पोलीस कर्मचारी यांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.त्यानंतर पोलीस निरीक्षक  यादव व पोलीस यांनी वाळू तस्करी होणाऱ्या ठिकाणी सापळा रचला. तसेच यवत पोलीस स्टेशन हद्दीत पाटस टोल नाका, पुणे सोलापूर महामार्ग, पाट्स दौड रोड या ठिकाणी वाळूने भरलेले सहा ट्रक ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच दौंड पोलीस स्टेशन हद्दीत वाळूने भरलेला १ ट्रक ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही कारवाईमध्ये एकूण ७६ लाख ३५,०००  रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.वरील ७ वाहनांपैकी चार वाहनांवरील चालकांना ताब्यात घेतले आहे. सचिन मोहन खरात (रा.खोरोची तालुका इंदापूर, जिल्हा पुणे) प्रकाश गयबी कसबे( रा. ढोकी उस्मानाबाद), मारुती मुरलीधर रणसिंग( रा.चौफुला तालुका दौंड, जिल्हा पुणे) गणेश कुंडलिक ठोंबरे(रा. शिरापूर तालुका दौंड, जिल्हा पुणे) अशी त्यांची नावे आहे. 

या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण संदीप पाटील, अप्पर पोलीस, अधीक्षक बारामती विभाग जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, बारामती क्राईम ब्रँचचे पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, चालक सतीश मोरे आरसीपी पथकातील २० पोलिस जवान तसेच यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील पोलीस जवान विजय मदने, संपत खबाले यांनी कारवाईत सहभागी झाले होते.

टॅग्स :BaramatiबारामतीPoliceपोलिसsandवाळू