शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

सावनेरात महिला डॉक्टरवर अ‍ॅसिडहल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 05:40 IST

तिघी जखमी : दारुड्या युवकाचे नशेत कृत्य, नागरिकांनी दिला चोप

लोकमत न्यूज नेटवर्कसावनेर (जि. नागपूर) : हिंगणघाट जळीत प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटत असताना नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे दारुड्याने नशेत महिला डॉक्टरवर अ‍ॅसिड फेकल्याची घटना गुरुवारी दुपारी १२.२० वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात महिला डॉक्टरसह अन्य दोघी शालेय विद्यार्थिनी जखमी झाल्या. परिसरातील नागरिकांनी आरोपीस पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी सावनेर पोलिसांनी भादंवि ३०७, ३२६ (ब) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.मिलिंद अशोक कन्हेरे (२२, रा. तेलंगखेडी, ता. सावनेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तिन्ही जखमींना नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती केले आहे. जखमी डॉक्टर ही नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापिका आहेत.नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पथक गुरुवारी नॅशनल एड्स कंट्रोल आॅर्गनायझेशन (नॅको) या प्रोजेक्टचे सर्वेक्षण करण्यासाठी सावनेर येथे आले होते. यात तीन महिला डॉक्टर, परिचारिका व आरोग्य सेवकाचा समावेश होता. त्यांची टीम कैकाडी महाराज मंदिराजवळ उभी असताना मिलिंद तिथे आला. तो दारू प्यायला होता. त्याने डॉक्टरांना ‘तेरा चेहरा खराब कर दूंगा’ असे म्हणत बाटलीतील अ‍ॅसिड त्यांच्या दिशेने फेकले. मात्र, डॉक्टरांनी लगेच पळ काढत जवळच्या झोपडीत आश्रय घेतला. काही वेळातच दुसरी टीम त्या मंदिराजवळ पोहोचली.काही वेळाने तो परत तिथेच आला आणि ‘तेरा चेहरा खराब कर दूंगा’ म्हणत त्यांच्या दिशेने बाटलीतील अ‍ॅसिड फेकले. त्यात महिला डॉक्टरच्या हात व पाय, त्यांच्यासोबत असलेल्या महिला रुग्णाचा चेहरा तसेच बाजूला उभ्या असलेल्या शालेय विद्यार्थिनीच्या गळ्यावर अ‍ॅसिड पडल्याने त्या भाजल्या. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी त्याला पकडले आणि चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.कठोर कारवाई करण्याची मागणीत्याने फेकलेले अ‍ॅसिड टॉयलेटसाठी वापरले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संतप्त नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करीत पोलीस ठाण्याच्या आवारात निदर्शने केली.

 

टॅग्स :MolestationविनयभंगWomenमहिला