शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

कॅफेत डोकावले अन् पडद्याआडचे चित्र पाहून सारेच चक्रावले; नाशिकमधील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 19:51 IST

एका बेसमेंटमधील कॅफेमध्ये टेबलच्या भोवती अंधार करून आणि पडदे लावून खास सोय आढळल्याने सारेच आश्चर्यचकित झाले.

Nashik Crime : एमडी प्रकरणामुळे गाजलेल्या नाशिकमधील काही रेस्टॉरंटमध्ये युवक युवतींसाठी पडदे टाकून खास सोय केली जाते अशा आशयाची तक्रार आल्यानंतर शनिवारी आमदार देवयानी फरांदे यांनी दुपारी सरकारवाडा पोलिसांसह धडक दिली. गंगापूर रोडवरील विद्या विकास सर्कलजवळ असलेल्या एका बेसमेंटमधील कॅफेमध्ये टेबलच्या भोवती अंधार करून आणि पडदे लावून खास सोय आढळल्याने सारेच आश्चर्यचकित झाले. अर्थात पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत कोणतीही कारवाई केली नव्हती.

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून कॅफे प्रकरण वाढत चालले आहे. हुक्का पार्लरवर तर अनेकदा छापे पडले आहेत, याशिवाय यापूर्वी एमडी ड्रग्जच्या वेळी नाशिक पोलिसांनी गंगापूर रोड कॉलेज रोडसह अनेक भागांत कॅफेंची तपासणी केली तेव्हा युवक-युवतींना अश्लील चाळे करताना पकडण्यात आले आणि त्यावेळी संबंधितांना तंबीही देण्यात आली आहे. मात्र, तरीही कॅफेचे फॅड कमी झालेले नाही. शनिवारी दुपारी अशाच प्रकारे विद्या विकास सर्कलजवळील एका कॅफेमध्ये अशाच प्रकारे युवक-युवतींसाठी खास सोय केल्याची तक्रार आमदार फरांदे यांच्याकडे आली. त्यानुसार सरकारवाडा पोलिसांना घेऊन त्याठिकाणी फरांदे पोहोचल्या. यावेळी बेसमेंटमध्ये कॅफे सुरू होता; परंतु वेगवेगळ्या दिशेने दरवाजे होते आणि आत अंधुक प्रकाशाचे दिवे आणि पडदे लावल्याचे आढळले.

पोलिसांकडून कोणतीही कारवाई नाहीआमदार फरांदे यांनी कॅफेवर धाड टाकून ताशी भाडे आकारण्याचा प्रकार उघड केला. मात्र, गंगापूर पोलिस ठाण्याने संबंधित हॉटेल चालक किंवा अन्य युवक-युवतींवर कोणतीही कारवाई केली नाही. उलट कोणत्या कलमान्वये दाखल करता येईल याचा अभ्यास करावा लागेल, असे उत्तर दिल्याने आमदार फरांदे संतप्त झाल्या आहेत. पोलिसांनी टाळाटाळ केल्यास यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर कारवाईची मागणी करावी लागेल, असे त्या म्हणाल्या.

मनपाकडूनही मोजमाप

नाशिक महापालिकेचे कर्मचारीदेखील गेले होते. पोलिसांच्या वतीने मनपाला पत्र देऊन तळमजल्यावरील बांधकाम करण्याची सूचना करण्यात आली आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी