शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
'Welcome my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
3
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
4
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
5
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
6
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
7
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
8
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
9
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
10
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
11
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
12
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
13
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
14
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
15
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
16
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
17
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
18
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
19
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
20
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
Daily Top 2Weekly Top 5

६ वर्षाच्या मुलीचं अपहरण करून केले लैंगिक शोषण, ४ दिवसांनंतरही आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 15:32 IST

पोलिसांनी पीडित मुलगी आणि शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपींचे स्केच (रेखाचित्र) प्रसिद्ध केले आहेत.

ठळक मुद्देदुसऱ्या दिवशी सकाळी गावापासून थोड्याच अंतरावर झुडपात मुलगी बेशुद्ध अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली. हापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संजीव सुमन म्हणाले की, या प्रकरणी आमची सहा पोलिसांची पथके तपास करत आहेत. 

उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात सहा वर्षाच्या मुलीचं अपहरण करुन बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर आहे. घटनेला चार दिवस उलटले तरीही उत्तर प्रदेशपोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी मोकाट आहे. दरम्यान पोलिसांनी पीडित मुलगी आणि शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपींचे स्केच (रेखाचित्र) प्रसिद्ध केले आहेत.

दिल्लीपासून १०० किलोमीटरवर असलेल्या गर्ह मुक्षतेश्वर गावातून मुलीच्या घराबाहेरुनच अपहरण करण्यात आलं होतं. एका दुचाकीस्वाराने तिला उचलून नेलं होतं. मुलीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी गावापासून थोड्याच अंतरावर झुडपात मुलगी बेशुद्ध अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली.

वैद्यकीय तपासणीत बलात्काराची झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मुलीला तातडीने मेरठच्या एका खास रुग्णालयात आणले गेले आणि तिच्यावर एका शस्त्रक्रिया झाली. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, तिची प्रकृतीत स्थिर आहे, पण धोक्यापासून मुक्त नाही. “तिला दीर्घ कालावधीसाठी उपचारांची आवश्यकता असेल, आम्हाला आणखी शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असू शकते,” असे मेरठ मेडिकल कॉलेज व रुग्णालयात प्रिन्सिपल एस. के. गर्ग यांनी सांगितले.

 



मुलीची प्रकृती स्थिर असली तरी तिचा जबाब घेणं शक्य नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मात्र, तिने आणि शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपींचे स्केच तयार करण्यात आले असून आम्ही लवकरच त्यांना अटक करु असा विश्वास उत्तर प्रदेश पोलिसांनी व्यक्त केला आहे. हापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संजीव सुमन म्हणाले की, या प्रकरणी आमची सहा पोलिसांची पथके तपास करत आहेत. 

 

 

मोठं यश! काश्मीरनंतर जम्मूमधील टेरर फंडिंगचा भांडाफोड; ६ जणांना अटक

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशPOCSO Actपॉक्सो कायदा