शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

गांधी विचार भाग २

By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST

मिळतेय संयमाची शक्तीमहात्मा गांधी यांच्या विचारांत नेमके असे काय आहे की संपूर्ण जग त्यांना मानवंदना करते हे जाणून घेण्याची इच्छा होती. विभागात गांधी समजून घेत असताना संयमाचे महत्त्व लक्षात आले. माझी सहनशीलता व संयम नक्कीच वाढले आहे. पुण्यतिथीच्या दिवशी कामाच्या ठिकाणी वादाचा प्रसंग निर्माण झाला. परंतु गांधीविचारांतून मिळालेल्या संयमातून समोरच्या ...


मिळतेय संयमाची शक्ती
महात्मा गांधी यांच्या विचारांत नेमके असे काय आहे की संपूर्ण जग त्यांना मानवंदना करते हे जाणून घेण्याची इच्छा होती. विभागात गांधी समजून घेत असताना संयमाचे महत्त्व लक्षात आले. माझी सहनशीलता व संयम नक्कीच वाढले आहे. पुण्यतिथीच्या दिवशी कामाच्या ठिकाणी वादाचा प्रसंग निर्माण झाला. परंतु गांधीविचारांतून मिळालेल्या संयमातून समोरच्या व्यक्तीची मानसिकता समजून घेतली.
-सरिता देवल

प्रामाणिकपणे काम करण्यावर भर
प्रामाणिकपणा हा महात्मा गांधी यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग होता. गांधी आणि त्यांचे विचार जाणून घेत असताना प्रामाणिकपणे समोर असलेले काम पूर्ण करण्याची ऊर्जा मिळाली आहे. नेमून दिलेले काम पूर्ण करण्यावरच भर असतो. पुण्यतिथीनिमित्त एक दिवस श्रद्धांजली वाहण्यापेक्षा रोज त्यांचे विचार कृतीत आणणे जास्त योग्य ठरेल असे मी मानतो.
-मनीष चव्हाण

वंचितांची सेवा हीच ईश्वरसेवा
महात्मा गांधी समजून घेत असताना समाजाप्रति आपले काही कर्तव्य आहे ही भावना निर्माण झाली. युवापिढीमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी माझे प्रयत्न असतात. शिवाय समाजातील वंचितांना जमेल तितकी मदत करतो. बापूंच्या पुण्यतिथीनिमित्त शाळकरी विद्यार्थ्यांपर्यंत त्यांचे विचार व महती पोहोचविणे हे माझे कर्तव्य होते व ते मी पार पाडले.
-अनिल सगाने

प्रेरणा सात्त्विकतेची
महात्मा गांधी यांचे सर्व विचार जर प्रत्यक्ष आयुष्यात अंगिकारले तर सर्वच समस्या दूर होतील. गांधी विचारांचे जवळून अध्ययन केल्यामुळे मनातील समाधान अन् सात्त्विकतेची भावना वाढीस लागली आहे. गांधी यांच्याप्रमाणेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ असण्यावर माझा व सहकाऱ्यांचा भर असतो. गांधी प्रत्यक्षात जगणे हीच त्यांना सर्वात मोठी श्रद्धांजली आहे असे मी मानतो.
-गणेश ढोबळे

साधे जीवन, उच्च विचार
महात्मा गांधी यांचे जीवनचरित्र जवळून अभ्यासले की डोळ्यासमोर झळकतो तो एक वाईट मार्गाकडे जाण्याच्या मार्गावर असलेला विद्यार्थी ते जागतिक मूल्यांची शिकवण देणारा महात्मा हा एक थक्क करणारा प्रवास. गांधी यांचे साधे जीवन, उच्च विचार या संस्कारांचे पालन करण्याचा कसोशीने प्रयत्न करतो. शिवाय गांधी यांचे मूल्य तरुणाईपर्यंत पोहोचविण्यावर माझा भर असतो.
-पुरुषोत्तम कामडी