शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

जनतेने ‘हात’ दिला अन् महादेव पावला; छत्तीसगडमध्ये महिला, OBC, आदिवासींची भाजपला साथ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2023 6:29 AM

निवडणुकांच्या सहा महिने अगोदरपर्यंत ‘यंदा परत काँग्रेस’ असेच छत्तीसगडमधील चित्र होते. भाजपचा चेहरा कोण असेल याचीदेखील शाश्वती नव्हती.

योगेश पांडेरायपूर : बहुतांश ‘एक्झिट पोल्स’ व राजकीय धुरिणांचे अंदाज धुळीला मिळवत भाजपने छत्तीसगडचा गड सर करून सर्वांनाच अचंबित केले. भूपेश बघेल यांच्या नेतृत्वातील सरकारविरोधातील जनतेतील नाराजीचा सूर काँग्रेसला अखेरपर्यंत कळालाच नाही. २०१८ ची पुनरावृत्ती होईल याच स्वप्नात काँग्रेसचे नेते राहिले व अति आत्मविश्वासाने पक्षाचा घात केला. तर, दुसरीकडे तळागाळात पोहोचत भाजपने ओबीसी, महिला व आदिवासी मतांवर भर दिला. त्यातच ‘महादेव ॲप’च्या प्रकरणामुळे भाजपला ऐन निवडणुकांच्या तोंडावर आयता मुद्दा मिळाला व भाजपने तो मुद्दा ‘कॅश’ करत आघाडी मिळवली.

निवडणुकांच्या सहा महिने अगोदरपर्यंत ‘यंदा परत काँग्रेस’ असेच छत्तीसगडमधील चित्र होते. भाजपचा चेहरा कोण असेल याचीदेखील शाश्वती नव्हती. मात्र, माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह, प्रदेशाध्यक्ष अरुण साव यांनी केंद्रीय नेतृत्वाच्या सूचनांनुसार सर्व जुन्या-नव्या घटकांची मोट बांधण्यास सुरुवात केली. दुसरीकडे काँग्रेसचे नेते भूपेश बघेल, टी.एस. सिंहदेव यांच्यासह विविध नेत्यांमध्ये अंतर्गत गटबाजी सुरूच होती. ऐन प्रचाराच्या कालावधीत काही कार्यकर्त्यांनी सोशल माध्यमांवरून काँग्रेसला अतिआत्मविश्वासदेखील नडेल असा इशारा दिला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करणे काँग्रेसला प्रचंड महागात पडले. 

ओबीसी मतदारांचा भाजपवरच विश्वासओबीसी व आदिवासी मतांवर सर्वच प्रमुख पक्षांची नजर होती. काँग्रेस व भाजपने यावेळी मोठ्या प्रमाणात ओबीसी उमेदवार मैदानात उतरविले होते. मूलभूत सुविधांचा अभाव असलेल्या अनेक जागांवर विकास आणि जातीय समीकरणांच्या आधारेच मतदारांपर्यंत पोहोचण्याचे भाजपचे नियोजन यशस्वी ठरले.

जनतेचा हात, ‘चाऊरवाले बाबा’ के साथयेथे नेहमीच धान हा महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह यांची ओळख ‘चाऊरवाले बाबा’ अशी असतानादेखील भाजपने याकडे दुर्लक्ष केले होते. यावेळी घोषणापत्रातच भाजपने धानाला ३१०० रुपये प्रति क्विंटल दर देण्याचे आश्वासन दिले. भाजपने हा मुद्दा जनतेपर्यंत प्रभावी पद्धतीने नेला.

‘त्या’ जागांवर विशेष मेहनत२०१८ च्या निवडणुकांत २० जागांवर भाजपला १० हजारांच्या आत मतांनी पराभव पत्करावा लागला होता. भाजपने अशा जागांवर मेहनत घेतली. दक्षिण छत्तीसगडमध्ये भाजपचा मागील निवडणुकीत दारूण पराभव झाला होता. आदिवासींपर्यंत पोहोचत भाजपने विजयाचा पाया रचला.

टॅग्स :Electionनिवडणूकchhattisgarh assembly electionछत्तीसगड विधानसभा निवडणूक २०२३BJPभाजपाcongressकाँग्रेस