शहरं
Join us  
Trending Stories
1
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
2
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
3
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
4
Twisha Sharma : MBA, योगा ट्रेनर, मॉडेल-अ‍ॅक्टर होती ट्विशा शर्मा; ज्या तारखेला लग्न झालं, त्याच दिवशी जग सोडलं
5
महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले
6
Sex Racket: नोकरीचं आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकललं; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ६ जणींची सुटका!
7
पुतिन यांच्या चीन दौऱ्याचा मोठा गेमप्लॅन; जिनपिंग यांच्याकडून 'या' महाप्रकल्पाला मंजुरी मिळवणार!
8
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
9
भारती सिंह घटस्फोट घेणार? हर्ष लिंबाचियासोबत बिनसल्याच्या चर्चांवर म्हणाली, "आम्ही दोघं..."
10
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
11
हृदयद्रावक! कारच्या मागच्या सीटवर झोपलेल्या नातीला आजोबा विसरले; गुदमरून चिमुकलीचा मृत्यू
12
Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?
13
Vastu Tips: बेडरूममध्ये नकारात्मकता जाणवतेय? 'हे' तीन वास्तू उपाय मिळवून देतील मन:शांती 
14
Twisha Sharma : 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
15
मंदिरांमधील सोन्यावर सरकारचा डोळा? सोशल मीडियावरील दाव्यामुळे खळबळ; सरकारने दिले स्पष्टीकरण
16
"मी AC मध्ये बसून तमाशा बघू शकत नाही...!" बंगालमधील 'नमाज बॅन'वर काय म्हणाले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
17
Numerology: तुमचा मोबाईल नंबर तुमच्यासाठी लकी आहे की अनलकी? मूलांकानुसार 'या' चुका टाळा
18
गाडीला अचानक हादरा देणारे Rumble Strips कशासाठी असतात, तुम्हाला माहितीये का?
19
हुंड्यामुळे ३३ वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, प्रेग्नंट असतानाच संपवलं जीवन; अभिनेत्याला बसला धक्का, म्हणाला-"तिचं लग्न झालंय हेच..."
20
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
Daily Top 2Weekly Top 5

अटीतटीच्या लढतीत घवघवीत यश; प्रथमच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन महिला आमदार! 

By स. सो. खंडाळकर | Updated: March 8, 2025 18:57 IST

Women's Day Special: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा इतिहास तपासला, तर महिला आमदार म्हणून फार कमी महिलांना संधी मिळालीय.

- सदाशिव प्रयागबाई खंडाळकर
छत्रपती संभाजीनगर :
जिल्ह्यातील फुलंब्री मतदारसंघातून अनुराधा चव्हाण, तर कन्नड मतदारसंघातून संजना जाधव यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केलं. प्रथमत:च असं घडलंय. जिल्ह्याचा इतिहास तपासला, तर महिला आमदार म्हणून फार कमी महिलांना संधी मिळालीय. अगदी बोटावर मोजता येतील एवढीच नावं घेता येतील. अगदी अलीकडे तेजस्विनी जाधव या कन्नडमधून त्यांचे पती रायभान जाधव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी झाल्या होत्या. आता तेजस्विनी जाधव यांचे पुत्र हर्षवर्धन जाधव यांना पराभूत करून संजना जाधव विजयी झाल्या आहेत. पती हर्षवर्धन यांचाच संजना यांनी पराभव केला.

राजस्थानचे राज्यपाल म्हणून हरिभाऊ बागडे गेल्यानंतर त्यांच्या राजकीय वारसदारांची संख्या एकीकडे वाढत असतानाच अनुराधा चव्हाण यांनी बाजी मारली आणि भल्याभल्यांना मागे सारत त्या फुलंब्रीच्या लोकप्रतिनिधी बनल्या. वरिष्ठांशी चांगले संबंध आणि स्वत:ची मजबूत आर्थिक बाजू तसेच हरिभाऊ बागडे यांचे मिळालेले आशीर्वाद या जोरावर अनुराधा चव्हाण यांनी यशश्री खेचून आणली.

महिला आरक्षण २०२९ मध्ये लागू होईल. तोपर्यंत तरी त्यांच्या वाट्याला संघर्ष आहेच. मुळात कोणताही राजकीय पक्ष महिलांना व युवकांना तिकिटे देताना प्राधान्य देऊ, असे जोरजोरात सांगत असतात. परंतु, प्रत्यक्षात त्यांचे वर्तन विपरीत घडत असते. हा नेहमीचा अनुभव आहे. म्हणूनच इतक्या वर्षांत वैजापूरहून एक विनायकराव पाटील यांच्या पत्नी शकुंतला पाटील व आशाताई वाघमारे यांना संधी मिळाली होती. ही फार पूर्वीची गोष्ट आहे.

गंगापूर तालुका हा कम्युनिस्टांचा एकेकाळी बालेकिल्ला होता. त्या काळात प्रख्यात कम्युनिस्ट नेते चंद्रगुप्त चौधरी यांच्या पत्नी कॉ. करुणाभाभी चौधरी निवडून आल्या होत्या. आता हा सारा इतिहासच झाला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद आरक्षणामुळे अनेक महिलांना मिळाली, पण विधानसभेतलं प्रतिनिधित्व फारसं नाहीच, असं म्हणावं लागेल. महिला आरक्षण सुरू झाल्यानंतर प्रत्यक्षात काय घडेल हे पाहणंही रंजकच ठरणार आहे!

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMLAआमदार