शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सासुरवाडीत 'लाडकी सूनबाई'; हर्षवर्धन जाधवांच्या गावातही पत्नी संजना यांना अधिक मते

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 13:17 IST

महायुतीतील प्रमुख नेत्यांच्या गावात संजना जाधव यांना भरघोस मते; पिशोर या स्वत:च्या गावातही पती हर्षवर्धन जाधव यांच्यापेक्षा अधिक मते

- प्रवीण जंजाळ
कन्नड :
कन्नड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शिंदेसेनेच्या उमेदवार संजना जाधव यांना सुरुवातीपासूनच विरोध करणाऱ्या महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या गावात संजना यांनाच भरभरून मते मिळाल्याचे निकालाअंती स्पष्ट झाले आहे.

कन्नड विधानसभा मतदारसंघातून शिंदेसेनेच्या उमेदवार संजना जाधव या विजयी झाल्यानंतर त्यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या गावांमध्ये जाधव यांना, तर विरोधी उमेदवारांना किती मते मिळाली याची उत्सुकता मतदारांना आहे. या अनुषंगाने माहिती घेतली असता महायुतीतील प्रमुख नेत्यांच्या गावात संजना जाधव यांना भरघोस मते मिळाल्याचे दिसून आले. उद्धवसेनेचे उमेदवार उदयसिंग राजपूत यांच्या नागद गावात त्यांना फक्त १५७ मतांची आघाडी मिळाली आहे. राजपूत यांना १ हजार १७६, तर संजना जाधव यांना १ हजार १९ मते मिळाली आहेत. तर हर्षवर्धन जाधव ४१२ मते मिळाली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतोष कोल्हे हे महायुतीच्या प्रचारापासून दूर होते. त्यांच्या करंजखेड या गावात संजना जाधव यांना १ हजार ८४८ मते मिळाली, तर उदयसिंग राजपूत यांना १ हजार ३९४ मते मिळाली. हर्षवर्धन जाधव ७८६ मते मिळाली.

संजना जाधव व हर्षवर्धन जाधव यांच्या पिशोर गावात ११ हजार २८० मतांपैकी संजना यांना हर्षवर्धन जाधव यांच्यापेक्षा १४६ मते जास्तीची मिळाली. संजना जाधव यांना ४ हजार २६७, हर्षवर्धन जाधव यांना ४ हजार १२१, तर उदयसिंग राजपूत यांना २ हजार ९२ मते मिळाली आहेत. कन्नड शहरातील आपल्या होम ग्राऊंडवर अपक्ष मनोज पवार व वंचित बहुजन आघाडीचे अयाज शहा यांना मतदारांनी चौथ्या व पाचव्या क्रमांकावर लोटले. कन्नड शहरातसुद्धा प्रथम क्रमांकाची मते संजना जाधव यांना मिळाली. शहरात झालेल्या २३ हजार ८२ मतांपैकी संजना जाधव यांना ७ हजार ५०४, उदयसिंग राजपूत यांना पाच हजार ४७८, तर हर्षवर्धन जाधव यांना ४ हजार ५५२ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे अयास शहा यांना २ हजार ५९४ मते मिळाली. अपक्ष मनोज पवार यांना १ हजार ३११ मतांवर समाधान मानावे लागले.

१३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
कन्नड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक १६ उमेदवारांनी लढविली. त्यातील शिंदेसेनेच्या विजयी उमेदवार संजना जाधव, दुसऱ्या क्रमांकाचे अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव आणि तिसऱ्या क्रमांकावरील उद्धवसेनेचे उमेदवार उदयसिंग राजपूत या तीन उमेदवारांव्यतिरिक्त इतर १३ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. यामध्ये वंचित आघाडी व मनसे या प्रमुख पक्षाच्या उमेदवारांचा समावेश आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकkannad-acकन्नडHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधव