शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कुठे मुक्काम, कुठे दांडी

By admin | Updated: June 15, 2015 00:09 IST

बीड : उन्हाळी सुट्यानंतर सोमवारपासून शाळा पूर्ववत सुरू होत आहेत. शाळा प्रवेशोत्सव हा नाविण्यपूर्ण प्रयोग यावेळी राज्याच्या शिक्षण विभागामार्फत राबविला जात आहे.

बीड : उन्हाळी सुट्यानंतर सोमवारपासून शाळा पूर्ववत सुरू होत आहेत. शाळा प्रवेशोत्सव हा नाविण्यपूर्ण प्रयोग यावेळी राज्याच्या शिक्षण विभागामार्फत राबविला जात आहे. त्याअंतर्गत जिल्हा परिषदेने शनिवारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना शाळांमध्ये मुक्कामी थांबून प्रवेशोत्सवाचे नियोजन करण्याचे आदेश दिले होते. काही ठिकाणी अधिकारी मुक्कामी होते मात्र, काही गावांमध्ये केवळ हजेरी लावून परतले.‘लोकमत’ने प्रवेशोत्सवाच्या अनुषंगाने केलेल्या स्टींगदरम्यान ही माहिती पुढे आली आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ नामदेव ननावरे यांनी २५ जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना शाळांच्या नावासह मुक्कामी राहण्याचे आदेश १२ जून रोजी दिले होते. ननावरे हे स्वत: धर्मापुरी (ता. परळी) येथील जि. प. माध्यमिक शाळेत मुक्कामी राहिले. त्यांनी शाळेच्या समस्या जाणून घेत प्रवेशाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी ग्रामस्थांशी चर्चा करून गुणवत्तावाढीसाठी उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. अंबाजोगाई, परळी, आष्टी येथे अधिकारी आढळून आले.शिक्षणाधिकारी भुर्रर्र....शिक्षणाधिकारी (प्रा) सुखदेव सानप यांना हिंगणी (ता. धारूर) शाळा दिली होती. मात्र, बैठकीसाठी रविवारी रात्री ते मुंबईला रवाना झाले. बैठक महत्त्वाची असल्यामुळे जावे लागले, परतल्यावर शाळेला भेट देणार आहे, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.या शाळांमध्ये नव्हते अधिकारीमाजलगाव तालुक्यातील रेणापूरी, खालापुरी, शेलापुरी, केसापुरी, नागडगाव, गेवराई तालुक्यातील चकलांबा, धोंडराई, पाटोदा तालुक्यातील थेरला, सौताडा येथे रात्री साडेनऊ वाजेपर्यंत अधिकारी नव्हते. (प्रतिनिधींकडून)सीईओ नामदेव ननावरे यांनी मुलांची शाळेबद्दलची भीती दूर व्हावी व शैक्षणिक वातावरण गावागावात तयार व्हावे यासाठी प्रवेशोत्सव आयोजित केला होता.४त्याअंतर्गत अधिकारी, कर्मचाऱ्यांना शाळा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी दिवसभर गावात थांबून प्रवेशाचे नियोजन करावयाचे होते.४शिवाय रात्री शाळेतच मुक्कामी थांबून विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी करायची होती.ंशाळा प्रवेशोत्सवाचे आधीच नियोजन केले होते. काही अधिकारी मुक्कामी गेले नसतील तर माहिती मागविली जाईल. बीईओंना सक्त सूचना दिल्या होत्या. शाळा मुक्कामाचा हा पहिलाच प्रयोग आहे. काही त्रुटी असतील तर त्या दुरूस्त केल्या जातील.- नामदेव ननावरे, सीईओ, बीडरविवारी काही गावांमध्ये अधिकारी दिवसभर होते. तेथील शैक्षणिक अडी-अडचणी अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या. यावेळी ग्रामस्थांनी समस्यांचा पाढा वाचून दाखवला. शिक्षक शाळेला दांड्या मारतात, संगणक बंद, शौचालयाचा अभाव, खिचडी यासह इतर समस्यांचा समावेश होता. परळी तालुक्यातील नागापूर येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला रविवारी रात्री साडेनऊपर्यंत कुलूप होते. केवळ दाराजवळच्या फळ्यावर प्रवेशोत्सव असे लिहून सोपस्कार पार पाडला होता.