रांजण भरण्यासाठी पाण्याचा शोध

By Admin | Updated: March 28, 2016 00:03 IST2016-03-27T23:59:41+5:302016-03-28T00:03:08+5:30

पैठण : गोदावरी पात्र कोरडे झाल्याने नाथांच्या पवित्र रांजणात पाणी भरण्यासाठी भाविक, वारकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे़

Water search to fill the rocks | रांजण भरण्यासाठी पाण्याचा शोध

रांजण भरण्यासाठी पाण्याचा शोध

पैठण : गोदावरी पात्र कोरडे झाल्याने नाथांच्या पवित्र रांजणात पाणी भरण्यासाठी भाविक, वारकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे़ गोदावरीच्या पाण्याशिवाय हा रांजण भरत नसल्याने गोदावरी पात्रात शोध घेऊन पाणी रांजणासाठी भाविक नेत असल्याचे दिसून आले़
नाथ महाराजांच्या वाड्यातील पवित्र रांजण तुकाराम बीजपासून भरण्यास प्रारंभ करण्यात आला आहे़ या रांजणात भगवान कृष्ण यांनी १२ वर्षे कावडीने पाणी आणून भरल्याचा इतिहास आहे़
दरम्यान, हा रांजण भरण्यासाठी मी दरवर्षी येईल असे आश्वासन नाथ महाराजांना भगवंताने दिले होते़ यानुसार नाथषष्ठीसाठी भगवंत हा रांजण भरण्यास येतात अशी धारणा भाविकांत आहे़
हा रांजण गोदावरीतून पाणी आणून भरावा लागतो; मात्र यंदा गोदावरी पात्रात जायकवाडी धरणातून पाणी सोडता येत नसल्याने भाविकांना गोदावरीत भटकंती करून पाणी शोधावे लागत आहे, तर गोदावरी पात्रात झरे करून त्यातील नितळ पाणी घ्यावे लागत आहे़ यामुळे यंदा पाणी आणणाऱ्या भाविकांची परीक्षाच भगवंत घेत आहे़

Web Title: Water search to fill the rocks