शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

आठ जिल्ह्यांसाठी व्हिजन-२०२५

By admin | Updated: May 8, 2014 23:52 IST

औरंगाबाद : मराठवाड्याच्या नियोजनबद्ध विकासासाठी शासनाच्या सर्व प्रादेशिक कार्यालयांनी व्हिजन-२०२५ तयार करावा, अशा सूचना विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज दिल्या.

 औरंगाबाद : मराठवाड्याच्या नियोजनबद्ध विकासासाठी शासनाच्या सर्व प्रादेशिक कार्यालयांनी व्हिजन-२०२५ तयार करावे, तसेच त्याचा उपयोग पुढील १० वर्षांच्या वाटचालीसाठी करावा, अशा सूचना विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात गुरुवारी शासनाच्या विविध प्रादेशिक कार्यालयांच्या प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत विभागीय आयुक्त जयस्वाल यांनी वरील सूचना दिल्या. बैठकीला कृषी, सार्वजनिक बांधकाम विभाग, सहकार, पोलीस, भूमी अभिलेख, जलसंपदा, महसूल, वने, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा आदी विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. प्रशासकीय कामात गतिशीलता येण्यासाठी, तसेच भविष्यातील नियोजनबद्ध विकासासाठी व्हिजन-२०२५ तयार करण्याची गरज असल्याचे आयुक्तांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. त्यानुसार मराठवाड्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या प्रादेशिक प्रमुखांनी तातडीने कामाला लागावे, तसेच शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण कामाचा ठसा उमटावा यासाठी डिसेंबर २०१४ अखेर पूर्ण होऊ शकणार्‍या निवडक कामांवर कार्यवाहीही सुरू करावी, असे जयस्वाल यांनी सांगितले. राज्य शासनाने गतिमान प्रशासनाच्या परिणामकारक कार्यवाहीसाठी वेळावेळी शासन निर्णय व परिपत्रकाद्वारे निर्देश दिले. शासनाच्या प्रत्येक विभागीय कार्यालयाने त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. प्रशासकीय कार्यालयातील सुधारणांच्या विविध बाबींवर लक्ष देणे गरजेचे आहे. अधिनस्त कार्यालयांनादेखील त्यासाठी कार्यवाही करण्यास सांगावे. नागरिकांची सनद, कार्यालयातील सीसीटीव्ही, लोकप्रतिनिधींच्या पत्रांवरील कार्यवाही, अभिलेख कक्ष, महिला अधिकारी-कर्मचार्‍यांसाठीच्या सुविधा, विशाखा समित्या कार्यक्षम करणे आदींवरही लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. विभागीय आयुक्त दरमहा घेणार आढावा विभागीय आयुक्त जयस्वाल हे यापुढे स्वत: प्रत्येक महिन्याला व्हिजन-२०२५ च्या कामाचा आढावा घेणार आहेत. प्रादेशिक कार्यालयांनी व्हिजन-२०२५ तयार करण्याचे काम वेगाने करावे, तसेच त्यातील काही गोष्टींची अंमलबजावणी चालू वर्ष संपण्यापूर्वीच सुरू करावी, असे आयुक्तांनी सांगितले. त्याचाही आढावा प्रत्येक बैठकीत घेतला जाणार आहे. शासनाची सर्व कार्यालये स्वतंत्र घटक म्हणून काम करत असतात; पण त्यांच्या कामात एकसारखेपणा आणल्यास त्याचा अधिक फायदा होऊ शकतो. शिवाय व्हिजन असेल तर पुढील वाटचाल गतीने होऊ शकते, म्हणून हा निर्णय घेतला आहे. - संजीव जयस्वाल, विभागीय आयुक्त