शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पालेभाज्यांचे भाव वाढले दुपटीने !

By admin | Updated: June 15, 2015 00:07 IST

बीड : पावसाळा अद्याप निटसा सुरू झाला नाही तोवरच पालेभाज्यांचे भाव दुप्पट झाल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. महागाईत आणखी भर पडल्याने हातचे राखूनच खरेदी केली जात आहे.

बीड : पावसाळा अद्याप निटसा सुरू झाला नाही तोवरच पालेभाज्यांचे भाव दुप्पट झाल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. महागाईत आणखी भर पडल्याने हातचे राखूनच खरेदी केली जात आहे.गेल्या तीन वर्षांपासून सतत दुष्काळ पडत आहे. त्यामुळे बाहेरील जिल्ह्यातून भाजीपाल्याची आवक केली जात आहे. दरम्यान, सात जून पासूनच पावसाला सुरूवात झाली आहे. वेळेवर पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी व सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे तर दुसऱ्या बाजूला भाजीपाल्यांचे भाव दुप्पट झाल्यामुळे याच लोकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर साधारणत: महिनाभरानंतर भाजीपाल्याचे भाव वाढतात. कारण पावसामुळे भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे आवक कमी होते परिणामी भाव वाढतात. परंतु यंदा परिस्थिती वेगळी झाली आहे. पावसाळा सुरू होत नाही तोच भाजीपाल्यांचे भाव कडाडले आहेत. कांदे, कोथींबीर, टोमॅटो, लसूण, अद्रक याचे भाव वाढले असल्यामुळे हातचे राखूनच खरेदी करीत आहेत. सकाळच्या वेळी भाजीमंडईत भाज्यासाठी आधी पैसे मोजावे लागत असल्याने अनेकजण सायंकाळी सहाच्या सुमारास भाजी मंडईत खरेदीसाठी जात आहेत. सायंकाळच्या वेळी काही प्रमाणात भाजीपाला स्वस्त मिळत असल्याचे काही नागरिकांचे मत आहे. एकंदरीत या भाववाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. (प्रतिनिधी)