शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
3
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
4
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
5
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
6
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
7
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
8
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
9
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
10
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
11
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
12
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
13
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
14
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
15
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
16
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
17
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
18
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
19
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
20
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई

Valentine Day : सामाजिक कार्याचा ध्यास घेतलेले दाम्पत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:14 PM

समाजकार्याच्या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन एकत्र आलो, असे सांगत शांताराम पंदेरे आणि मंगल खिंवसरा यांनी सहजीवनाचा प्रवास उलगडला

- रूचिका पालोदकर 

औरंगाबाद : नवरा म्हणून निवड करताना ना त्याची नोकरी महत्त्वाची वाटली ना त्याच्याकडे घर आहे का, हा विचार डोक्यात आला. सांपत्तिक स्थितीपेक्षा त्याची एक माणूस म्हणून असणारी प्रतिमा, सामाजिक कार्यातले झपाटलेपण मनात भरले आणि आर्थिक, सामाजिक परिस्थितीत मोठी तफावत असूनही आम्ही समाजकार्याच्या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन एकत्र आलो, असे सांगत शांताराम पंदेरे आणि मंगल खिंवसरा या दाम्पत्याने ‘व्हॅलेंटाईन डे’च्या मुहूर्तावर त्यांचा सहजीवनाचा प्रवास उलगडून सांगितला.

सामाजिक क्षेत्रात वाहून घेतलेले शहरातील लोकप्रिय जोडपे म्हणजे शांताराम पंदेरे आणि मंगल खिंवसरा. त्यांचा सहजीवनाचा अनुभव ४० वर्षांपेक्षाही मोठा. राशीन (ता. वैजापूर) येथील सुखवस्तू मारवाडी घरात वाढलेल्या मंगलतार्इंची वयाच्या जेमतेम १८ व्या वर्षी शांताराम यांच्याशी गाठ पडली. युवक क्रांती दलाचे कार्यकर्ते असणाऱ्या शांताराम यांनी पूर्णवेळ चळवळीसाठी देण्याचे ठरविले आणि त्यासाठी घर (मुंबई) सोडून त्यांनी मराठवाडा कार्यक्षेत्र निवडले. याच दरम्यान दोघांची भेट झाली, विचार जुळले आणि त्यांचा विवाह झाला. लग्न झाले तेव्हा खिशात दमडीही नव्हती. भूक लागली तर काय खाणार, असा प्रश्न होता. पण संघटना आणि बांधिलकी मानणारे कार्यकर्ते, त्यांच्याशी शांतारामचे जोडलेले नाते यामुळे भूक पळूनच गेली, असे मंगलताई आवर्जून सांगतात. 

दोन परस्परविरोधी आर्थिक-सांस्कृतिक वातावरण व विपरीत परिस्थितीतून संघर्ष करत जात असताना आणि एकाच ध्येयाने बांधले गेलो असल्यामुळे दोघांतील नाते काळानुसार अधिकच मजबूत होत गेले. जीवनातील अत्यंत कठीण काळात मंगलने ज्या कमालीच्या धीराने परिस्थितीला तोंड दिले, तसे कदाचित मलाही जमले नसते. मंगलच्या या धैर्य व योगदानाला साष्टांग दंडवत, असे शांताराम प्रांजळपणे कबूल करतात. 

तो सोनेरी क्षणजिद्द, चिकाटी, कसोटी, तत्त्वाने जगणे यातूनही माणूस मोठा होतो. मोठे होण्यासाठी पैसा लागत नाही. आमच्या दोघांच्या आयुष्यात पैसा हा कधी महत्त्वाचा नव्हता आणि असणारही नाही. या सहजीवनात कधी उपाशी राहिलो, कधी अनवाणी चाललो; पण साथ सोडली नाही. माणूस म्हणून जगणारा आणि इतरांनाही तसे जगण्याचा अधिकार देणारा सहचर असावा लागतो. म्हणूनच लग्न करण्याचा निर्णय हा आमच्या आयुष्यातील सोनेरी क्षण होता, असे या द्वयांनी सांगितले.

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेSocialसामाजिकsocial workerसमाजसेवकAurangabadऔरंगाबाद