शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

युरियाचे झाले पाणी पाणी

By admin | Updated: July 11, 2016 01:20 IST

औरंगाबाद : शहरात रविवारी सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा आनंद घेण्यात एकीकडे शहरवासीय मग्न होते. मात्र त्याच वेळी दुसरीकडे रेल्वे स्टेशनवरील मालधक्क्यावर हमालांची धावपळ सुरू होती.

औरंगाबाद : शहरात रविवारी सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा आनंद घेण्यात एकीकडे शहरवासीय मग्न होते. मात्र त्याच वेळी दुसरीकडे रेल्वे स्टेशनवरील मालधक्क्यावर हमालांची धावपळ सुरू होती. रेल्वेने आलेली युरियाची हजारो पोती भर पावसात उतरविण्यात आली. त्यामुळे ती भिजण्यापासून वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. तरीही शेकडो पोती भिजली. अनेक पोत्यांमधील युरियाचे पाणी पाणी झाले.विशाखापट्टणम येथून दोन मालगाडीतून प्रत्येकी १३०० टन खत मालधक्क्यावर पोहोचले होते. आलेला माल थेट ट्रकमध्ये भरणे अपेक्षित आहे. मालगाडी थांबून राहिली तर अतिरिक्त भाडे भरण्याची वेळ येते. ही जबाबदारी माल वाहतूकदार अथवा हुंडेकरी यांची असते. पावसामुळे होणारे नुकसान लक्षात घेऊन मालधक्क्यावर शेड उभारण्यात आले आहे. परंतु शेडमधील जागा अपुरी पडत असल्याने आलेला माल उघड्यावर उतरविण्यावर भर दिला जातो. अशाच प्रकारे रविवारीदेखील खताची शेकडो पोती मालधक्क्याच्या दोन्ही बाजूंनी उघड्यावर उतरविण्यात आली होती. पावसाला सुरुवात झाल्यानंतर काही पोत्यांवर प्लास्टिकची ताडपत्री झाकण्यात आली; परंतु अनेक पोती झाकण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे युरियाची शेकडो पोती पावसात भिजली. हमालांनी बरीच पोती ट्रकमध्ये ठेवली. तरीही शेकडो पोती पावसात तासन्तास भिजत राहिली. ही पोती अशीच शेतकऱ्यांपर्यंत जाईल. त्यामुळे तिची गुणवत्ता किती कायम राहील, असा प्रश्न निर्माण होत आहे. खताची पोती ताडपत्रीने झाकण्यात आली होती. शिवाय पोती थेट ट्रकमध्ये लोड करण्यात आली. मालगाडी रिकामी केल्यानंतर संपूर्ण जबाबदारी ही माल उतरविणाऱ्यांची असते, असे मालधक्का व्यवस्थापक शैलेशकुमार म्हणाले.