दलित वस्ती असुविधांच्या गर्तेत

By Admin | Updated: July 26, 2014 00:40 IST2014-07-26T00:28:11+5:302014-07-26T00:40:46+5:30

संतोष शिंदे, वाटेफळ परंडा तालुक्यातील वाटेफळ येथील दलित वस्तीत २५ वर्षापूर्वी विद्युतपोल उभारण्यात आले आहेत. मात्र अद्यापही तारा न ओढल्याने ही वस्ती अंधारात आहे.

Under the degeneration of inequalities | दलित वस्ती असुविधांच्या गर्तेत

दलित वस्ती असुविधांच्या गर्तेत

संतोष शिंदे, वाटेफळ
परंडा तालुक्यातील वाटेफळ येथील दलित वस्तीत २५ वर्षापूर्वी विद्युतपोल उभारण्यात आले आहेत. मात्र अद्यापही तारा न ओढल्याने ही वस्ती अंधारात आहे. येथे लाखो रुपये खर्चून राबविलेली पाणीपुरवठा योजनाही कुचकामी ठरली असून, नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत.
वाटेफळ येथील दलित वस्तीत २५ वर्षापूर्वी विद्युतपोल उभारण्यात आले. मात्र अद्यापपर्यंत या पोलवरती तारा ओढलेल्या नसल्याने ही वस्ती अंधारातच आहे. घरगुती वीज कनेक्शन घ्यावयाचे असल्यास शेजारच्या गल्लीतील पोलवरुन घ्यावे लागत असल्याने वस्तीतील नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या अनेकांनी अद्यापही वीज कनेक्शन घेतले नसल्याचे दिसून येते. वस्तीतील पोलवर तारा ओढून विद्युत पुरवठा जोडून देण्याची येथील ग्रामस्थांची अनेक वर्षापासून मागणी आहे. मात्र याकडे कानाडोळा केला जात असल्याचे दिसून येते. येथील नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. गावातील काही भागात विविध योजनांच्या माध्यमातून पाणी टाक्या देण्यात आल्या आहेत. मात्र या वस्तीत एकही टाकी नसल्याने महिलांना जीव मुठीत धरुन आडातील पाणी शेंदून आणावे लागते. या आडाला असलेले दोन्ही रहाटही मोडकळीस आले आहेत. त्यातच आडाचा कट्टाही अर्धवट तुटलेला असल्याने पाणी शेंदताना महिलांना मोठी कसरत करावी लागत आहे. (वार्ताहर)
लाखोंची योजना कुचकामी
२००१ मध्ये जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे दलित वस्ती पाणीपुरवठा योजनेंतर्गत येथे पाण्याची टाकी बांधण्यात आली होती. वस्तीतील कुटुंबांनी ग्रामपंचायतीकडे रीतसर पावती फाडून नळ कनेक्शन घेतले. या योजनेतील नळाद्वारे वस्तीतील नागरिकांना सुमारे दोन महिने पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र त्यानंतर या टाकीत पाणी न सोडल्याने लाखो रुपये खर्चून सुरु केलेली ही योजनाही कुचकामी ठरल्याचे दिसून येते. वस्तीमध्ये ३ हातपंप घेण्यात आले असले तरी सद्यस्थितीत त्यातील एकही हातपंप सुरु नसल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.

Web Title: Under the degeneration of inequalities