शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

उदगीर, निलंग्यात औपचारिकता बाकी

By admin | Updated: July 16, 2014 01:25 IST

उदगीर/निलंगा/औसा : लातूर जिल्ह्यातील उदगीर, निलंगा व औसा नगरपालिकेच्या नगराध्यक्षांची निवडणूक लागली आहे़ १

उदगीर/निलंगा/औसा : लातूर जिल्ह्यातील उदगीर, निलंगा व औसा नगरपालिकेच्या नगराध्यक्षांची निवडणूक लागली आहे़ १६ जुलै रोजी या निवडी होणार आहेत़ परंतु, निलंगा व उदगीर पालिकेत आता प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज राहिल्याने येथील नगराध्यक्षांच्या घोषणेची केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे़ दरम्यान, औसा पालिकेत मात्र काँग्रेसच्या दोन उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवल्याने बुधवारी निवडणूक घ्यावी लागणार आहे़उदगीर, निलंगा व औसा नगरपालिकेत नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे़ निलंगा नगरपालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता आहे़ येथील नगराध्यक्षपद खुल्या संवर्गातील महिलेसाठी सुटले आहे़ याठिकाणी काँग्रेसने विद्या धानोरकर यांच्या रुपाने एकमेव उमेदवार दिला आहे़ अर्ज दाखल करण्यादिवशी काँग्रेसकडून त्यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने त्याच दिवशी त्यांची निवड निश्चित झाली होती़ बुधवारी त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा होणे शिल्लक राहिले आहे़दरम्यान, उदगीर नगर परिषदेत अध्यक्षपदासाठी विद्यमान नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे व बस्वराज बागबंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते़ मंगळवारी उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी बस्वराज बागबंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला़ त्यामुळे आज १६ जुलै रोजी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत एकमेव उमेदवार राजेश्वर निटुरे यांचाच उमेदवारी अर्ज राहिल्याने त्यांची आज अधिकृत घोषणा होणार आहे़औशाचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे़ या प्रवर्गातील काँग्रेसच्या नीता सूर्यवंशी व मंजुषा हजारे या दोघींनी अर्ज दाखल केले आहेत़ बुधवारी त्यांच्या निवडीसाठी मतदान घ्यावे लागणार आहे़ (वार्ताहर)