एकाच परीक्षार्थीला दोन हॉलतिकिटे

By Admin | Updated: December 13, 2014 23:38 IST2014-12-13T23:38:48+5:302014-12-13T23:38:48+5:30

माजलगाव : शिक्षक पात्रता पदासाठी माजलगाव येथील एका परिक्षार्थीला चक्क दोन वेगवेगळ्या सेंटर कोडचे प्रवेशपत्र मिळाले आहे़ यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा गलथान कारभार समोर आला आहे़

Two pilots of the same examiner | एकाच परीक्षार्थीला दोन हॉलतिकिटे

एकाच परीक्षार्थीला दोन हॉलतिकिटे


माजलगाव : शिक्षक पात्रता पदासाठी माजलगाव येथील एका परिक्षार्थीला चक्क दोन वेगवेगळ्या सेंटर कोडचे प्रवेशपत्र मिळाले आहे़ यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा गलथान कारभार समोर आला आहे़
महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे मार्फत रविवारी शिक्षक पात्रता परीक्षा होत आहे़ माजलगाव येथील गीतांजली ज्ञानोबा रुचके या परीक्षार्थीने आॅनलाईन फॉर्म भरला होता़ त्यानंतर काही दिवसांनी प्रवेशपत्र मिळणार होते़ शुक्रवारी तिने आॅनलाईन प्रवेशपत्र काढून घेतले़ यावेळी तिला चक्क दोन वेगवेगळ्या केंद्राचे प्रवेशपत्र दिल्याचे समोर आले आहे़
एका प्रवेशपत्राचा केंद्र कोड ५३०४ आसन क्र. ५३०४१२०११४ बलभिम महाविद्यालय बीड असा आहे तर दुसऱ्या प्रवेशपत्राचा केंद्र कोड क्र. ५३१४ आसन क्रमांक ५३१४१२००३९ केंद्र सेंट अ‍ॅन्स इंग्लिश स्कूल बीड हा आहे़ या दोन्ही प्रवेशपत्रांमध्ये फक्त वेळेतच फरक आहे. सदरील परीक्षार्थीला वेगवेगळ्या परीक्षा केंद्राचे प्रवेशपत्र मिळाल्याने ती गोंधळून गेली आहे़ (वार्ताहर)

Web Title: Two pilots of the same examiner