शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

सिल्लोडजवळ ट्रिपल सीट दुचाकीस्वारांना ट्रकने उडवले; एक जागीच ठार, दोघे गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 19:31 IST

डिग्रस फाट्यावर अपघात, ट्रकचालक अजिंठा पोलिसांच्या ताब्यात

सिल्लोड : जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावार डिग्रस (पानस) फाट्यावर ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले. या अपघातात दुचाकीस्वार महिला जागीच ठार झाली, तर दुचाकीवरील इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी रात्री ८ वाजता झाला.

द्वारकाबाई रघुनाथ सोनवणे (वय ७५) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तर अजय त्र्यंबक सोनवणे (२२), संजीवनी विजय सोनवणे (१५, सर्व रा. डिग्रस) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. गोळेगाव येथील रुग्णालयात उपचार घेऊन ते डिग्रसकडे घरी जात होते. फाट्यावर रस्ता ओलांडताना त्यांच्या दुचाकीला सिल्लोडकडून जळगावकडे जाणाऱ्या ट्रकने (एमपी- ०६, एचजी- ३११४) मागून जोरात धडक दिली. यात द्वारकाबाई उडून ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाल्या. तर अजय व संजीवनी दूर फेकल्या गेल्याने गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे जखमींवर उपचार सुरू आहेत. माहिती मिळल्यानंतर अजिंठा ठाण्याचे निरीक्षक अमोल ढाकणे, भागवत शेळके घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

‘सीआरपीएफ’चा जवान सुटीवर अन् अपघात झालाअपघातात गंभीर जखमी असलेले अजय हे १५ जानेवारी रोजी ‘सीआरपीएफ’मध्ये भरती झालेले असून त्यांची ट्रेनिंग सुरू आहे. २६ ऑगस्ट रोजी १५ दिवसांची सुटी घेऊन ते डिग्रस येथे आलेले आहे. संजीवनी ही त्याची चुलत बहीण आजारी असल्याने तिला व काकू द्वारकाबाईला घेऊन गोळेगाव येथील रुग्णालयात गेले होते. परत येताना अपघात झाला. अजय व त्यांची बहीण संजीवनी गंभीर जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संजीवनीच्या आई-वडिलांचे निधन झाले असून तिचा सांभाळ आजी द्वारकाबाई करत होत्या. अपघाता द्वारकाबाई ठार झाल्याने संजीवनी पोरक्या झाल्या आहेत.

 

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAccidentअपघात