शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर कोसळताच मागील वाहनाने दुचाकीस्वारास चिरडले, तरुणाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 15:52 IST

रेल्वे उड्डाणपुलावर गुरुवारी रात्री अपघात, घटना पाहण्यासाठी गेलेला दुसरा तरुण पुलावरून कोसळून गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : वाळूजकडून शहराकडे येत असताना दुचाकीचा तोल जाऊन कोसळलेल्या राहुल आनंद बागुल (२४) याला मागून जाणाऱ्या सुसाट वाहनाने चिरडले. गुरुवारी रात्री छावणीच्या रेल्वे उड्डाणपुलावर घडलेल्या अपघातात राहुलचा जागीच मृत्यू झाल्याचे छावणी पोलिस ठाण्याचे प्रभारी डॉ. विवेक जाधव यांनी सांगितले.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुकुंदवाडी रामनगर येथील रहिवासी राहुल गुरुवारी रात्री उशिरा वाळूजकडून शहराकडे येत होता. छावणीतील रेल्वे उड्डाणपुलावर नियंत्रण सुटून त्याची दुचाकी (एमएच २०- एच ई - ७२२०) घसरली. या तो रस्त्यावर कोसळला. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या सुसाट वाहनाने त्याला चिरडले. स्थानिकांनी धाव घेत त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, त्याला चिरडणारे वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अपघात बघायला गेलं अन् पुलावरून कोसळलंदरम्यान, याच अपघातादरम्यान कडूबा सोनवणे हा तरुण गंभीर जखमी झाला. रेल्वे उड्डाणपुलावर एका बाजूने हा अपघात झालेला असताना दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या कडूबा यांनी दुचाकी थांबवून रस्ता ओलांडून अपघातस्थळी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, उड्डाणपुलावर येणाऱ्या आणि जाणाऱ्या रस्त्याच्या मधील जागेत जाऊन तो पुलावरून खाली कोसळला. यात कडूबा देखील गंभीर जखमी झाल्याचे निरीक्षण विवेक जाधव यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Young biker crushed to death after fall on road in Sambhajinagar.

Web Summary : Rahul Bagul, 24, died after falling off his bike and being run over by a vehicle on a flyover in Chhatrapati Sambhajinagar. Another man was injured while trying to view the accident.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर