शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

राशनसाठी चढावी लागते तीन मजली इमारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:09 IST

बनकिन्होळा : बनकिन्होळा गावात मोबाइल नेटवर्क मिळत नसल्यामुळे स्वस्त धान्य दुकानातील ई-पॉस मशीनवर अंगठा देण्यासाठी वयोवृध्दांसह लाभधारकांना चक्क ग्रामपंचायतीच्या ...

बनकिन्होळा : बनकिन्होळा गावात मोबाइल नेटवर्क मिळत नसल्यामुळे स्वस्त धान्य दुकानातील ई-पॉस मशीनवर अंगठा देण्यासाठी वयोवृध्दांसह लाभधारकांना चक्क ग्रामपंचायतीच्या तिसऱ्या मजल्यावर जावे लागत आहे. विशेष बाब म्हणजे तिसऱ्या मजल्यावर गेल्यानंतरही नेटवर्कची बोंबाबोंब असल्याने लाभार्थ्यांना तासन‌्तास ताटकळत बसावे लागत आहे.

राशनकार्डधारकाचे आधार लिंक केल्याशिवाय राशन धान्य देता येत नसल्याने दुकानदारास ई-पॉस मशीन व कार्डधारकांना घेऊन ग्रामपंचायतीच्या तिसऱ्या मजल्यावर जावे लागते. रेंजअभावी वयोवृद्ध लाभधारकांना तासन‌्तास लाईन लावून ताटकळत बसावे लागत आहेत. कार्डधारकाचा अंगठा जोपर्यंत प्रेस होत नाही. तोपर्यंत त्यांना धान्य दिले जात नाही. एकीकडे शासन डिजिटल इंडियाच्या गप्पा मारते. परंतु आजही ग्रामीण भागात डिजिटल सुविधा पोहचलीच नाही. विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या गावातील ही परिस्थिती असेल तर खेडोपाडी काय अवस्था असावी याची कल्पनाच न केलेली बरे. या मूलभूत समस्येकडे या भागातील लोकप्रतिनिधी तरी लक्ष देतील का, असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत.

----------

स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही दयनीय अवस्था

बाभुळगाव (बु), वरखेडी, भायगाव, बनकिन्होळा, गेवराई सेमी गावांमध्ये मोबाइल नेटवर्क मिळत नाही. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी बेरोजगारांना तालुक्यांचा रस्ता धरावा लागतो. तर विद्यार्थ्याना ऑनलाइन अभ्यासाकरिता घराच्या छतावर जाऊन नेटवर्क शोधावे लागते. स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही ही गावे दूरसंचार क्रांतीपासून कोसो दूर आहेत. रेंज नसल्याने संकटसमयी कोणाशी संपर्कदेखील करता येत नाही.

--------------

फोटो कॅप्शन : राशन मिळण्यासाठी लाभार्थ्यांना ग्रामपंचायतीच्या तिसऱ्या मजल्यावर ई-पॉस मशीनवर अंगठा देण्यासाठी जावे लागते. मात्र, नेटवर्क मिळत नसल्यामुळे त्यांना ताटकळत थांबावे लागते.