जिल्ह्यात तिघांनी संपविली जीवनयात्रा

By Admin | Updated: May 6, 2014 23:59 IST2014-05-06T23:58:50+5:302014-05-06T23:59:19+5:30

बीड : वेगवेगळ्या कारणावरुन जिल्ह्यात मागील चोवीस तासामध्ये तिघांनी जीवनयात्रा संपविली़

Three lives ended in the district | जिल्ह्यात तिघांनी संपविली जीवनयात्रा

जिल्ह्यात तिघांनी संपविली जीवनयात्रा

बीड : वेगवेगळ्या कारणावरुन जिल्ह्यात मागील चोवीस तासामध्ये तिघांनी जीवनयात्रा संपविली़ केज, परळी, गेवराई तालुक्यात या घटना घडल्या़ दरम्यान जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असल्याचे दिसत आहे. गेवराई येथील संजयनगर भागातील सुनील काटीअण्णा शिंदे (वय ३५) याने दारुच्या नशेत सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास विषारी द्रव प्राशन केले़ ज्योती सुनील शिंदे यांच्या खबरीवरुन गेवराई ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ तरूणाने घेतले विष केज तालुक्यातील बोरगावात नवनाथ बन्सी कांबळे (वय २२) याने सर्व्हे क्ऱ४२ मध्ये विषारी द्रव प्राशन केले़ बन्सी परसराम कांबळे यांच्या माहितीवरुन केज ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे़ इसमाने घेतला गळफास आष्टी तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी येथे आजीनाथ बापू काजळे (वय ५५) यांनी सोमवारी सकाळी आठ वाजता चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली़ बबन नामदेव काजळे यांच्या खबरीवरुन आष्टी ठाण्यात नोंद झाली़ त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समोर आलेले नाही.

Web Title: Three lives ended in the district