शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
5
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
6
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
7
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
8
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
9
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
10
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
11
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
12
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
13
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
14
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
15
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
16
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
17
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
18
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
19
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
20
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
Daily Top 2Weekly Top 5

सातारा परिसराची तहान जारवरच

By admin | Updated: June 2, 2014 01:34 IST

साहेबराव हिवराळे , औरंगाबाद सातारा व देवळाई परिसरात पाऊण लाखाच्या वर लोकसंख्या असून, दरवर्षी टँकर आणि पाण्याच्या जारवरच नागरिकांना तहान भागवावी लागत आहे.

साहेबराव हिवराळे , औरंगाबाद सातारा व देवळाई परिसरात पाऊण लाखाच्या वर लोकसंख्या असून, दरवर्षी टँकर आणि पाण्याच्या जारवरच नागरिकांना तहान भागवावी लागत आहे. सातारा परिसरासाठी गेल्या तीन महिन्यांपासून १५ टँकरची मागणी ग्रामपंचायतीने जिल्हा प्रशासनाकडे केली होती. प्रत्यक्षात केवळ ६ टँकर मिळाले. गेल्यावर्षी फेब्रुवारीतच पाण्याची तीव्रटंचाई निर्माण झाली होती. तेव्हा टँकरच्या फेर्‍यांमध्येही वाढ करण्यात आली होती. यंदा फेब्रुवारीपासून अर्ज करूनही प्रशासनाकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याची नाराजी शासन दरबारी पोहोचली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने ६ टँकर आज सातारा परिसरात पाठवले. पाणीपातळी खोल गेल्यामुळे खाजगी टँकर आणि जारच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे. या भागात वर्षभर खाजगी पाण्याचा धंदा जोरात सुरू आहे. सातार्‍यात जारचे पाणी वापरणे प्रतिष्ठेचे ठरत आहे. जास्तीच्या टँकरसाठी पाठपुरावा जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयात १५ टँकरसाठी रीतसर मागणी केली असून, कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याच्या योजनेसाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. सध्या ६ टँकरने पाणी दिले जात असून, जास्तीच्या टँकरसाठी वरिष्ठांकडे मागणी केली आहे, असे सरपंच अलका शिरसाट व ग्रामसेवक भास्कर साळवे यांनी सांगितले. किती दिवस करणार खर्च सातारा परिसरात बोअरच्या पाण्याने तळ गाठला असून, खाजगी टँकरचे पाणी वापरावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी मात्र खर्च सुरूच आहे. पिण्याच्या पाण्याची सोय करण्याकडे कुणीही लक्ष देत नाही. आंदोलन करण्याची वेळ आली आहे.असे सविता कुलकर्णी यांनी सांगितले. तहान भागत नाही देवीदास नरवडे म्हणाले की, जारच्या पाण्याने तहान भागत नाही. आम्हा सामान्यांना पाणीटंचाईचा फटका बसतो. मनपाप्रमाणे शुद्ध पाणीपुरवठा करून नागरिकांची तहान भागवावी लागते. टँकरच्या अपूर्ण फेर्‍या परिसराचा विस्तार बघता आठवड्यातून एकदा टँकर येते. टँकरची संख्या वाढविण्यासाठी सतत पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. किती दिवस टँकरवर अवलंबून राहावे लागणार आहे, असे हरिभाऊ राठोड यांनी सांगितले. बाटलीच्या पाण्यावर जास्त खर्च अनेकदा तक्रार करूनही शुद्ध पाणीपुरवठ्याकडे कुणीही लक्ष दिलेले नाही. अजून किती दिवस बाटलीतील पाण्यासाठी खर्च करावे लागणार? असा प्रश्न संतोष पारखे यांनी उपस्थित केला. सामान्य व्यक्तीचा खर्च वाढला दीपक पाडळकर म्हणाले की, पाणीपुरवठ्याची सोय नसल्यामुळे व जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने नाइलाजाने बाटलीबंद पाणी वापरावे लागत आहे. त्यामुळे सामान्य व्यक्तीचा खर्च प्रचंड वाढला आहे. टँकरचे पाणी मिळत नाही. कामगारांना सायकलवर पाणी वाहून न्यावे लागते.