शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

मोबदला वाटपासाठी आणखी १५० कोटी आले

By admin | Updated: May 8, 2014 23:51 IST

औरंगाबाद : डीएमआयसी प्रकल्पासाठी संपादित बिडकीन येथील जमिनीच्या मोबदलावाटपासाठी उद्योग खात्याने प्रशासनाला आणखी १५० कोटी रुपयांचा निधी दिला आहे

औरंगाबाद : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरीडॉर (डीएमआयसी) प्रकल्पासाठी संपादित बिडकीन येथील जमिनीच्या मोबदलावाटपासाठी उद्योग खात्याने जिल्हा प्रशासनाला आणखी १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीचे लवकरच वाटप केले जाणार असल्याचे भूसंपादन अधिकारी तथा पैठण-फुलंब्री उपविभागीय अधिकारी संभाजी अडकुणे यांनी सांगितले. दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वी आलेल्या शंभर कोटी रुपयांच्या निधीचे वाटप पूर्ण झाले असून यातून सुमारे सव्वाशे शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला आहे. डीएमआयसीअंतर्गत बिडकीन, निलजगाव, बन्नी तांडा, बंगला तांडा आणि नांदलगाव येथील २३५१ हेक्टर जमीन संपादित केली जात आहे. जानेवारी महिन्यातच शेतकर्‍यांकडून संमतीपत्रेभरून घेण्यात आली. त्यानंतर लगेचच प्रशासनाने १३१४ कोटी रुपयांच्या मोबदल्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला. राज्य सरकारने त्याला मंजुरीही दिली; मात्र लोकसभा निवडणुकीमुळे काही दिवस ही प्रक्रिया रखडली; परंतु आता पंधरा दिवसांपूर्वीच उद्योग विभागाने १३१४ कोटींपैकी पहिल्या टप्प्यात शंभर कोटी रुपये दिले. त्याचे आठवडाभरापूर्वीच आधी ७५ आणि नंतर २५ कोटी या प्रमाणे शेतकर्‍यांना वाटप करण्यात आले. आता गुरुवारी उद्योग खात्याने आणखी १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. उपविभागीय अधिकारी संभाजी अडकुणे यांनी सांगितले की, आतापर्यंत शंभर कोटी रुपयांचे वाटप पूर्ण झाले आहे. आज आणखी दीडशे कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. भूसंपादनाचे चित्र गाव हेक्टर शेतकरी बिडकीन१४७८१७८३ निलजगाव५९५६ बंगला तांडा२९०३७७ बन्नी तांडा१८३३९६ नांदलगाव३४०२९९ एकूण२३५१२९११