शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विमा योजनेस जुलअखेरपर्यंत मुदत

By admin | Updated: July 10, 2014 01:00 IST

उस्मानाबाद : केंद्र शासनाने सुधारित राष्ट्रीय कृषी विमा योजना पुन्हा राबविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली.

उस्मानाबाद : राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रमांतर्गत हवामान आधारित पीक विमा योजना राबविण्यात आली. मात्र जुन जुलैच्या पावसाची वाट पाहण्याअगोदरच योजनेची मुदत संपल्याने शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळवता आला नाही. त्यामुळे केंद्र शासनाने सुधारित राष्ट्रीय कृषी विमा योजना पुन्हा राबविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली.राष्ट्रीय पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०१४ पीक विमा ही योजना सर्व पिकांसाठी ऐच्छिक केली असून, कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता चलनाद्वारे बँकेत भरणे आवश्यक आहे. चालू हंगामात कर्ज वितरण राष्ट्रीयकृत बँकेकडून करण्यात आल्याने पीक विमा हप्ता शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत भरून आपले पीक संरक्षित करावे, असे आवाहनही कृषी अधिकारी तोटावार यांनी केले आहे. या योजनेमध्ये ६० ते ८० टक्के जोखीमस्तर ठेवण्यात आला आहे. पिकानुरुप दर हेक्टरी १३ हजार ते २ लाख ४२ हजारापर्यत विम्याचे संरक्षण कवच पिकांना लाभणार आहे. सोमवार ७ जुलै पासून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. यापूर्वीच्या योजनेत वंचित असलेल्या शेतक-यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. या योजनेत ज्वारी, बाजरी, मका, उडीद, मूग, तूर, भुईमूग, तीळ, सोयाबीन, सूर्यफूल, कापूस व कांदा या पिकांचा समावेश केला आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांनी बँकेकडे विमा प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना ज्या पिकाचा विमा उतरवयाचा आहे ते पीक शेतात पेरल्याबद्दल तलाठ्याचा पीक पेऱ्याचा दाखला, सातबारा आणि आठ अ च्या उताऱ्यासह नजीकच्या बँकेत हप्ता भरावा. या योजनेअंतर्गत अति अल्प व अल्प भूधारकांना विमा हप्त्याच्या १० टक्के सूट असून, त्यांनी विमा हप्त्यावरील दराच्या ९० टक्के प्रमाणे भरणा करावयाचे आहे. खरीप हंगामाकरिता उंबरठा उत्पादनाच्या किमंतीपर्यंत व उंबरठा उत्पादनापेक्षा जादा किमंतीपर्यंत प्रति हेक्टरी दिलेल्या रकमेवर पीक विमा हप्ता शेतकऱ्यांनी तातडीने भरून या योजनेचा लाभ घ्यावा, असेही कृषी विभागाने कळविले आहे. (प्रतिनिधी)