‘स्वाराती’च्या कर्मचा-याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 23:45 IST2017-10-07T23:45:23+5:302017-10-07T23:45:23+5:30

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील कनिष्ठ लिपिक संतोष अन्साराम जाधव (वय ४२) यांनी तलावात उडी मारून आत्महत्या केली.

The suicide of 'Swaraati' employee | ‘स्वाराती’च्या कर्मचा-याची आत्महत्या

‘स्वाराती’च्या कर्मचा-याची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील कनिष्ठ लिपिक संतोष अन्साराम जाधव (वय ४२) यांनी तलावात उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी ८.३० वाजता उघडकीस आली.
संतोष जाधव हे मागील दोन दिवसापासून बेपत्ता होते. नातेवाईकांची सर्वत्र शोधाशोध सुरू होती. अखेर शनिवारी सकाळी अंबाजोगाई लगतच्या चनई शिवारातील खोपरनाथ तलावातील पाण्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. गेल्या २० वर्षांपासून संतोष जाधव हे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात सेवा बजावत होते. मनमिळाऊ स्वभावाचा सहका-याच्या अचानक मृत्यूमुळे स्वारातीच्या डॉक्टर आणि कर्मचारी वर्गातून हळहळ व्यक्त होत आहे. मयत संतोष जाधव यांच्या पश्चात आई, भाऊ, बहीण, पत्नी, दोन अपत्ये असा परिवार आहे.

Web Title: The suicide of 'Swaraati' employee