विद्यार्थ्यांची तक्रार; सेंट झेवियर्स शाळेचा पंचनामा

By Admin | Updated: February 10, 2016 00:19 IST2016-02-09T23:55:43+5:302016-02-10T00:19:22+5:30

गेवराई : येथील सेंट झेवियर्स शाळेतील १५ विद्यार्थी व आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शाळेबाबत तक्रार केली.

Students complaint; St. Xaviers School's Panchnama | विद्यार्थ्यांची तक्रार; सेंट झेवियर्स शाळेचा पंचनामा

विद्यार्थ्यांची तक्रार; सेंट झेवियर्स शाळेचा पंचनामा


गेवराई : येथील सेंट झेवियर्स शाळेतील १५ विद्यार्थी व आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शाळेबाबत तक्रार केली. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी, नायब तहसीलदार यांनी शाळेची झाडाझडती घेतली.
शाळेत प्रवेशाच्या वेळी शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढले, शाळेत येण्यास विलंब झालेल्या विद्यार्थ्यांना रोख स्वरुपात दंड आकारणे, कपाळावर गंध लावणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षा करणे आदी स्वरुपाच्या तक्रारींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी व कार्यकर्त्यांनी शाळेची चौकशी करण्याची मागणी लावून धरली. त्यासाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात तासभर ठिय्या दिला. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी ए.एस. मसरे, नायब तहसीलदार वैजनाथ जोशी आदींनी विद्यार्थ्यांसह थेट शाळेत धाव घेतली. मुख्याध्यापक अमोल भाले म्हणाले, तक्रारीत तथ्य नाही, बदनामीचा डाव आहे. (वार्ताहर)
सेंट झेवियर्स या इंग्रजी माध्यमाच्या शाळेबाबत विविध तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या परवानगीने नायब तहसीलदारांसमवेत चौकशी केली. यामध्ये काही विद्यार्थ्यांनी आपली कैफियत मांडली. योग्य ती कारवाई केली जाईल.- ए.एस. मसरे, गटशिक्षणाधिकारी, गेवराई

Web Title: Students complaint; St. Xaviers School's Panchnama