‘लोकमत’ च्या स्वागताने विद्यार्थी उत्साहित

By Admin | Updated: June 17, 2014 00:39 IST2014-06-17T00:25:26+5:302014-06-17T00:39:33+5:30

हिंगोलीत उपक्रम : विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत

Students are excited to welcome 'Lokmat' | ‘लोकमत’ च्या स्वागताने विद्यार्थी उत्साहित

‘लोकमत’ च्या स्वागताने विद्यार्थी उत्साहित

हिंगोली : विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाची गोडी लागावी, या उद्देशाने शाळेच्या पहिल्याच दिवशी ‘लोकमत’ च्या वतीने जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. ‘लोकमत’ च्या या उपक्रमाने उत्साहीत झालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद शिक्षकांनाही प्रोत्साहित करून गेला.
‘लोकमत’ च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी वर्षभर विविध कार्यक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांना हसत-खेळत शिक्षण घेत असताना त्यांच्या ज्ञानात भर पडावी, या दृष्टिकोणातून राबविण्यात येणाऱ्या या कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद मिळतो.
त्या अनुषंगाने चालू शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी, त्यांचे कौतुक व्हावे या दृष्टिकोणातून या विद्यार्थ्यांचे तसेच शाळेतील शिक्षकांचे स्वागत करण्याचा निर्णय ‘लोकमत’ ने घेतला. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध शाळांनी राबविण्यात आलेल्या या उपक्रमास भरभरून प्रतिसाद मिळाला. शाळेमध्ये पहिल्यांदाच आपले कोणीतरी स्वागत करीत आहे, ही कल्पनाच विद्यार्थ्यांना आनंददायी वाटणारी होती.
स्वागतानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद शिक्षकांनाही प्रोत्साहीत करणारा होता. ‘लोकमत’ या उपक्रमाचे शिक्षकांनीही भरभरून कौतुक केले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Students are excited to welcome 'Lokmat'