शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्य कर्करोग रूग्णालयातील भाभा ट्रॉन व लिनर एक्सलेटरमुळे रुग्णांची वेटींग होणार कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2017 11:31 IST

किरणोपचारासाठी उपयुक्त २५ कोटींच्या लिनर एक्सलेटर यंत्र आणि बंकरला प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे़. या दोन्हीमुळे किरणोपचाराची वेटिंग कमी होण्यास मोठी मदत होईल.

ठळक मुद्दे भाभा ट्रॉन यंत्रासाठी बंकर उभारणीचे काम प्रगथीपथावर असून डिसेंबरअखेर हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे़. याचबरोबर किरणोपचारासाठी उपयुक्त लिनर एक्सलेटर यंत्र आणि बंकरला प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे़.

औरंगाबाद : शासकीय कर्करोग रुग्णालय (राज्य कर्करोग संस्था) परिसरात भाभा ट्रॉन यंत्रासाठी बंकर उभारणीचे काम प्रगथीपथावर असून डिसेंबरअखेर हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे़. याबरोबरच आता किरणोपचारासाठी उपयुक्त २५ कोटींच्या लिनर एक्सलेटर यंत्र आणि बंकरला प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे़. या दोन्ही अत्याधुनिक यंत्रामुळे रुग्णालयात किरणोपचारासाठी येणा-या रुग्णांची  वेटिंग कमी होण्यास मोठी मदत होईल.

किरणोपचाराच्या रुग्णांचे वेटिंग कमी होण्याच्या दृष्टीने हॉस्पिटलला ‘भाभा ट्रॉन’ हे खास भारतीय बनावटीचे रेडिएशन मशीनही प्राप्त झाले आहे. यासाठी रुग्णलयाच्या परिसरात बंकर उभारण्यात येत आहे. याचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. बंकरचे काम पूर्ण होताच ‘भाभा ट्रॉन’ रुग्णसेवेत दाखल होईल.

रूग्णालयात किरणोपचारासाठी सध्या अडीच  महिन्यांची वेटींग करावी लागत आहे़. ही वेटींग कमी करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहे़.  गेल्या पाच वर्षामध्ये हजारो रूग्णांना येथील उपचारामुळे नवसंजीवनी मिळाली़. नव्या यंत्रामुळे किरणोपचारासाठी मोठा हातभार लागणार आहे.

रूग्णांना फायदा कर्करोग रूग्णालयात नेहमीच रूग्णांची गर्दी असते़. रेडिओ थेरपीसाठी रूग्णांना वेटींग करावी लागते. सध्या भाभा ट्रॉनसाठी बंकर उभारणीचे काम सुरू आहे़. राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा मिळाल्यानंतर ९८ कोटी मंजूर झालेत. त्यातील ४३ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे़. आता २५ कोटींच्या लिनर एक्सलेटर आणि बंकरला प्रशासकीय  मंजूरी मिळाल्याने रूग्णांचा याचा फायदा होणार आहे़. असे कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड म्हणाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलGovernmentसरकार