श्री विसर्जन मिरवणूक वेळेत सुरू व समाप्त करा

By Admin | Updated: September 7, 2014 00:53 IST2014-09-07T00:51:21+5:302014-09-07T00:53:55+5:30

औरंगाबाद : श्री विसर्जन वेळेच्या आत संपवा, असे आवाहन पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी केले आहे.

Start and finish the Sri Visharjan procurement in time | श्री विसर्जन मिरवणूक वेळेत सुरू व समाप्त करा

श्री विसर्जन मिरवणूक वेळेत सुरू व समाप्त करा

औरंगाबाद : सोमवार, दि.८ सप्टेंबर रोजी श्री विसर्जन मिरवणूक सकाळी सुरू करा व वेळेच्या आत संपवा, जल्लोषपूर्ण वातावरणात; पण शांततेत मिरवणूक पार पडण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना केले आहे.
सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत त्यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी व्यासपीठावर सहायक पोलीस आयुक्त अरविंद चावरिया व औरंगाबाद शहर गणेश महासंघ उत्सव समितीचे अध्यक्ष प्रमोद राठोड, नवीन शहर गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबन डिडोरे, सिडको-हडको सर्वपक्षीय गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षांची प्रमुख उपस्थिती होती.
पोलीस आयुक्तांनी सांगितले की, सोमवारी अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्यांवर धाडी टाकण्यात येतील, दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल. असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी उपस्थितांनी समस्या मांडल्या. याप्रसंगी शहरातील बहुतांश गणेश मंडळांचे पदाधिकारी हजर होते.

Web Title: Start and finish the Sri Visharjan procurement in time