शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

सेंट लॉरेन्स, नाथ व्हॅली सेमीफायनलमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 10:55 IST

जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ मैदानावर सुरू असलेल्या लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट लॉरेन्स, नाथ व्हॅलीने सेमीफायनलमध्ये धडक मारली, तर द जैन इंटरनॅशनल आणि केम्ब्रिज संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. आज झालेल्या सामन्यात विशाल धुमाळ, शहद ओपलकर, अमेय गवई आणि संकेत पाटील सामनावीर ठरले.

ठळक मुद्देआंतरशालेय क्रिकेट स्पर्धा : द जैन इंटरनॅशनल, केम्ब्रिज उपांत्यपूर्व फेरीत

औरंगाबाद : जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ मैदानावर सुरू असलेल्या लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट लॉरेन्स, नाथ व्हॅलीने सेमीफायनलमध्ये धडक मारली, तर द जैन इंटरनॅशनल आणि केम्ब्रिज संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. आज झालेल्या सामन्यात विशाल धुमाळ, शहद ओपलकर, अमेय गवई आणि संकेत पाटील सामनावीर ठरले.

आज झालेल्या पहिल्या सामन्यात सेंट लॉरेन्सने राजे शिवाजी संघावर ४ गडी राखून मात केली. राजे शिवाजी संघाने प्रथम फलंदाजी करीत ९ बाद ६२ धावा केल्या. त्यांच्याकडून सागर हिवाळेने १६ व बजरंग जाधवने १४ धावा केल्या. सेंट लॉरेन्सकडून विशाल धुमाळने ८ धावांत ४ गडी बाद केले. शुभम तुपे व श्रेयस बनसोडे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात सेंट लॉरेन्सने विजयी लक्ष्य ९.३ षटकांत ४ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून विशाल धुमाळने ४ चौकारांसह २१ धावा केल्या.

दुसऱ्या समान्यात द जैन इंटरनॅशनलने होलीक्रॉस संघावर ८ गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाºया होलीक्रॉसने १0 षटकांत ८ बाद ४६ धावा केल्या. त्यांच्याकडून ऋतुराज सावळेने २१ धावा केल्या. द जैन इंटरनॅशनलकडून अमेय गवईने ९ धावांत ४ गडी बाद केले. अनुराग शर्माने ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात जैन इंटरनॅशनलने विजयी लक्ष्य ५.१ षटकांत २ बाद ४७ धावा करीत गाठले. त्यात सर्वाधिक २२ अवांतर धावांचा समावेश आहे. अमेय गवईने नाबाद १३ धावा केल्या. होलीक्रॉसकडून ऋतुराज सावळेने २ गडी बाद केले.

तिस-या सामन्यात नाथ व्हॅलीने रायन इंरटनॅशनलचा १0 गडी राखून पराभव केला. रायन इंटरनॅशनलने प्रथम फलंदाजी करताना १0 षटकांत ७ बाद ५८ धावा केल्या. त्यांच्याकडून यश गाढवे याने २ चौकारांसह १५ धावा केल्या. नाथ व्हॅलीकडून देवांग मिश्राने ८ धावांत ३ गडी बाद केले. शहद ओपलकर व दिव्यम मिश्रा यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात नाथ व्हॅलीने विजयी लक्ष्य ५.४ षटकांत बिनबाद ५९ धावा करीत गाठले. त्यांच्याकडून शहद ओपलकरने ४ चौकार, एका षटकारासह ३0 व दिव्यम मिश्राने ३ चौकारांसह २३ धावा केल्या. चौथ्या सामन्यात केम्ब्रिजने बळीराम पाटील संघावर २६ धावंनी मात केली. केम्ब्रिजने प्रथम फलंदाजी करीत १0 षटकांत २ बाद १0९ धावा केल्या. त्यांच्याकडून संकेत पाटीलने ४२ चेंडूंत एक षटकार व ८ चौकारांसह ६१ आणि ओंकार चलक याने २ षटकार व एका चौकारांसह १0 चेंडूंत नाबाद २१ धावा केल्या. बळीराम पाटील संघाकडून ऋतुराज विधातेने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात बळीराम पाटील संघाने ९ बाद ८३ धावा केल्या. त्यांच्याकडून रोहित मघाडेने ३१ चेंडूंत ५ चौकारांसह ३६ व आकाश शिंदेने १६ धावा केल्या. केम्ब्रिजकडून सिमर राजपालने १९ धावांत ३ गडी बाद केले. रौनक डोडियाने २, तर ऋषी तोतलाने १ गडी बाद केला.आजचे सामनेसकाळी ८ वाजता : स. भु. हायस्कूल, औरंगाबाद वि. द जैन इंटरनॅशनल स्कूल१0 वाजता : केम्ब्रिज स्कूल वि. द जैन इंटरनॅशनलदुपारी १२ वा. : सेंट लॉरेन्स वि. नाथ व्हॅली (उपांत्य फेरी)