शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

अपहाराच्या चौकशीसाठी पथक

By admin | Updated: July 8, 2014 00:57 IST

बीड : शिरुर कासार तालुक्यातील निर्मल भारत योजनेत झालेल्या ३६ लाख रुपयांच्या अपहाराचा लोकमतने पर्दाफाश केला होता़ त्यानंतर जिल्हा परिषदेचा पंचायत विभाग खडबडून जागा झाला़

बीड : शिरुर कासार तालुक्यातील निर्मल भारत योजनेत झालेल्या ३६ लाख रुपयांच्या अपहाराचा लोकमतने पर्दाफाश केला होता़ त्यानंतर जिल्हा परिषदेचा पंचायत विभाग खडबडून जागा झाला़ अपहाराच्या चौकशीसाठी तडकाफडकी पथक स्थापन करण्यात आले आहे़ घोटाळेबाजांवर फौजदारी कारवाईच्या हालचाली सुरु झाल्या आहेत़लोकमतच्या सोमवारच्या अंकात 'शौचालयाचे ३६ लाख ग्रामसेवकाच्या घरात'या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते़ निर्मल भारत योजनेंतर्गत शिरुर कासार तालुक्यातील वारणी व गोमळवाडा या ग्रामपंचायतींना अनुक्रमे २७ लाख ५० हजार ८०० व १५ लाख ५९ हजार ४०० रुपये मिळाले होते़ मात्र त्यापैकी तब्बल ३६ लाख रुपये बँक खात्यावरुन परस्पर उचलण्यात आले होते़ दोन्ही गावांसाठी ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेल्या अशोक कदम यांना गट विकास अधिकारी बाबासाहेब सूर्यवंशी यांनी नोटीस बजावून शिस्तभंगाच्या कारवाईची तंबी दिली होती़लोकमतच्या वृत्ताची पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नईमोद्दीन कुरेशी यांनी गंभीर दखल घेतली़ जिल्हा स्वच्छता व पाणी मिशनचे कार्यक्रम व्यवस्थापक एस़ बी़ वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र पथक चौकशीसाठी नेमण्यात आले आहे़ हे पथक गावात जाऊन बांधलेले शौचालय, अर्धवट बांधकामाचे शौचालय, ग्रामपंचायतीला किती निधी मिळाला, तो खात्यावरुन कसा उचलण्यात आला याची सखोल चौकशी करणार आहे़ त्यानंतर त्याचा अहवाल पंचायत विभागाला दिला जाणार आहे़दरम्यान, चौकशीसाठी पथक नेमले गेल्याने घोटाळ्यात सहभागी असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे़ (प्रतिनिधी)गटविकास अधिकारीही कचाट्यात !शौचालयाच्या निधीत अपहार झाल्यानंतर नेमण्यात आलेले पथक गट विकास अधिकारी बाबासाहेब सूर्यवंशी यांचीही चौकशी करणार आहे़शौचालयाचा निधी बांधकाम पूर्ण झाल्याशिवाय ग्रामपंचायतला देता येत नाही़ मात्र शिरुर कासारमध्ये काम पूर्ण होण्याआधीच ग्रामपंचायतीला खिरापत वाटल्याप्रमाणे लाखोंचा निधी देण्यात आला़पथकाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर सत्य समोर येईल़ त्यानंतर कारवाईची दिशा ठरविण्यात येईल, असे पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नईमोद्दीन कुरेशी म्हणाले़प्रसंगी फौजदारी कारवाई करण्याचेही संकेत त्यांनी दिले आहेत़