मेंढपाळ कुटुंबावर मध्यरात्री हल्ला; मारहाण करून केली दोन लाखाची लूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 12:53 IST2025-06-04T12:51:44+5:302025-06-04T12:53:45+5:30

गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Shepherd family attacked in the middle of the night; beaten and robbed of Rs. 2 lakh | मेंढपाळ कुटुंबावर मध्यरात्री हल्ला; मारहाण करून केली दोन लाखाची लूट

मेंढपाळ कुटुंबावर मध्यरात्री हल्ला; मारहाण करून केली दोन लाखाची लूट

गंगापूर: मांजरी शिवारात मंगळवारी (दि. ३) रात्री मुक्कामी थांबलेल्या मेंढपाळांच्या कुटुंबावर रात्री दोन वाजेच्या सुमारास पंधरा ते वीस जणांच्या टोळक्याने हल्ला केला. मेंढपाळांना मारहाण करीत त्यांच्याजवळील सोने,रोख रक्कम व मोबाईल असा दोन लाखाचा ऐवज घेऊन पोबारा केला.

घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे, प्रदीप टेमकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी गंभीर जखमींना गंगापूर उपजिल्हा रुग्णालय दाखल केले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून जखमींना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भाऊसाहेब विथुबा शिंगाडे(वय ५०) सुमनबाई शिंगाडे, सीताराम शिंगाडे, आशाबाई (सर्व रा.सोमधना ता.येवला जिल्हा नाशिक) हे दरोडेखोरांच्या मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत.

Web Title: Shepherd family attacked in the middle of the night; beaten and robbed of Rs. 2 lakh