साडेपाच हजारांवर विहिरींची कामे अपूर्ण

By Admin | Updated: December 16, 2014 01:06 IST2014-12-16T00:29:58+5:302014-12-16T01:06:28+5:30

संजय तिपाले , बीड महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर केलेल्या वैयक्तिक तसेच सार्वजनिक विहिरींची कामे धिम्या गतीने सुरू आहेत.

Separately, the works of the wells in the 5000s are incomplete | साडेपाच हजारांवर विहिरींची कामे अपूर्ण

साडेपाच हजारांवर विहिरींची कामे अपूर्ण


संजय तिपाले , बीड
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर केलेल्या वैयक्तिक तसेच सार्वजनिक विहिरींची कामे धिम्या गतीने सुरू आहेत. वैयक्तिक लाभाच्या साडेपाच हजारावर विहिरी चार वर्षांपासून अपूर्ण असल्याची माहिती पुढे आली आहे.
२०१० ते २०१४ दरम्यान जिल्ह्यात वैयक्तिक लाभाच्या १ लाख ९० हजार रूपये खर्चाच्या विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या. सार्वजनिक विहिरींसाठी ५ लाख ५० हजार रूपये इतक्या खर्चाची मर्यादा होती. प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर विहिरींची कामे सुरूही झाली होती. मात्र बहुतांश शेतकऱ्यांना मस्टर मिळाले नाहीत. त्यामुळे कामे करूनही नोंद होऊ शकली नाही. परिणामी संबंधितांना कामे करूनही पैसे मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या अशा तक्रारीही आहेत.
पूर्वी छापील मस्टर होते त्यामुळे अडचणी होत्या. आता अशी स्थिती नाही. खर्चाची मर्यादा देखील वाढविली आहे. वैयक्तिक लाभाच्या विहिरीसाठी ३ लाख तर सार्वजनिक विहिरींसाठी अमर्याद खर्चाची तरतूद आहे. जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यामुळे लोकांच्या हाताला कामे मिळण्याबरोबरच अपूर्ण कामे पूर्ण करण्याकडे कल आहे. दरम्यान, एखाद्या गावात वर्षभरात सात कामे अपूर्ण असल्यास नवीन कामांना प्रशासकीय मान्यता देता येत नाही, अशी अडचण आहे. त्यामुळे अपूर्ण कामे तातडीने मार्गी लावल्याशिवाय पर्यायच शिल्लक नाही.
अपूर्णत्वाची कारणे
विहिरींची कामे अपूर्ण असल्यामागे अनेक कारणे आहेत. त्यात कामे करूनही मस्टरअभावी त्याची नोंद न झाल्याने पैसे अपुरे मिळाले. तरतुदीपेक्षा खर्च अधिक, काही विहिरींना पाणी न लागणे, काही ठिकाणी कामे करूनही अद्यापपर्यत पैसे मिळाले नाहीत, कुशल मजूरांचा अभाव अशा कारणांचा समावेश आहे.

Web Title: Separately, the works of the wells in the 5000s are incomplete