शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

सेनेचा तिळपापड

By admin | Updated: May 8, 2014 23:47 IST

औरंगाबाद : महापालिकेतील सत्ताधार्‍यांमध्ये पाणीपुरवठ्यावरून राजकारण पेटले आहे.

 औरंगाबाद : महापालिकेतील सत्ताधार्‍यांमध्ये पाणीपुरवठ्यावरून राजकारण पेटले आहे. भाजपाचे उपमहापौर संजय जोशी यांनी किमान पाणीपुरवठ्यात येणार्‍या अडचणींचा काल ७ मे रोजी शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिवसेनेचा जळफळाट झाल्याने खा.चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी सुभेदारीवर तातडीने पाणीपुरवठा विभागाची बैठक घेण्यात आली. बैठकीला महापौर कला ओझा यांच्यासह कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांची उपस्थिती होती. लोकसभा निवडणूक काळातही अडचणी होत्याच; मात्र नगरसेवक प्रचारात गुंतलेले असल्याने पालिका प्रशासनापर्यंत नागरिकांची ओरड पोहोचली नाही. २४ एप्रिलनंतर पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकाबाबत ओरड सुरू झाली. महापौर कला ओझा यांच्यासह एकाही पदाधिकार्‍याने पाणीपुरवठ्याप्रकरणी तोंड उघडले नाही. पंधरा दिवसांपासून वर्तमानपत्रात सिडको-हडकोतील पाणीपुरवठ्याप्रकरणी वृत्त येत आहे. ते वृत्त वाचून पालिका सत्ताधारी, विरोधी पक्षाने अथवा प्रशासनाने आढावा घेणे क्रमप्राप्त होते. मात्र, दोन अभियंत्यांच्या जिवावर सगळा विभाग सोडून सर्वांनी दुर्लक्ष केले. परिणामी मुबलक पाणी असतानाही दुष्काळासारखा अनुभव नागरिकांना आला. निवडणुकीच्या कामावर असलेले कर्मचारी अजून परतलेले नाहीत. आयुक्तांनी घेतली बैठक आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे यांनी काल ७ मे रोजी पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकाबाबत दोन बैठका घेतल्या. आयुक्त म्हणाले, सिडको- हडकोचा पाणीपुरवठा सुरळीत होत आला आहे. वॉर्डनिहाय वेळापत्रकाचा आढावा घेतला. ज्या त्रुटी होत्या, त्या पूर्णपणे दूर करण्यात आल्या आहेत. ३.५ एमएलडी पाणी वाढणार सिडको-हडकोला सध्या २६ एमएलडी पाणीपुरवठा होतो आहे. त्यामध्ये आणखी साडेतीन एमएलडी पाणीपुरवठा वाढविण्यासाठी प्रशासनाने फ ारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राला आज भेट दिली. कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता यू. जी. शिरसाठ, उपअभियंता के. एम. फालक यांच्यासह इतर अधिकारी होते. फारोळ्याला पाहणी करू न वॉटर रिसायकलिंग करण्यात येईल. मागील आठ दिवसांत रसायनांची मात्रा वाढविण्यात आल्यामुळे पाणी पुन्हा वापरात आले नाही. आता पाणी बर्‍या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे साडेतीन एमएलडी पाणी वाढविण्याचा प्रयत्न आहे, असे अभियंता कोल्हे यांनी सांगितले.