पर्यटन हवाई सेवेवर शिक्कामोर्तब!

By Admin | Updated: November 29, 2014 00:31 IST2014-11-29T00:18:25+5:302014-11-29T00:31:37+5:30

औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा लेण्या पाहण्यासाठी मुंबईत दाखल होणाऱ्या विदेशी आणि देशी पर्यटकांसाठी खास मुंबईहून अजिंठा हवाई सेवा सुरू करण्यात येणार आहे.

Seeking tourism air services! | पर्यटन हवाई सेवेवर शिक्कामोर्तब!

पर्यटन हवाई सेवेवर शिक्कामोर्तब!

औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा लेण्या पाहण्यासाठी मुंबईत दाखल होणाऱ्या विदेशी आणि देशी पर्यटकांसाठी खास मुंबईहून अजिंठा हवाई सेवा सुरू करण्यात येणार आहे. ही सेवा देणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. १५ डिसेंबरला हवाई सेवेची चाचणीही घेण्यात येणार आहे.
दरमहा दीड ते दोन हजार विदेशी पर्यटक अजिंठा लेण्या पाहण्यासाठी येतात. बहुतांश पर्यटक मुंबईहून विमानाद्वारे किंवा रेल्वेने औरंगाबादेत येतात. १०९ कि.मी. अंतर वाहनाने प्रवास करून त्यांना अजिंठा येथे पोहोचावे लागते. काही विदेशी पर्यटकांना ही प्रक्रिया खूपच कठीण वाटते. मुंबईहून थेट अजिंठा लेण्यांपर्यंत हेलिकॉप्टर सेवा असावी, अशी मागणी होती. एका खाजगी कंपनीने ही सेवा देण्यासाठी पुढाकार घेतला. एमटीडीसीच्या मुंबईतील अधिकाऱ्यांनीही कंपनीच्या या प्रस्तावाला क्षणार्धात संमती दिली.

 

Web Title: Seeking tourism air services!