शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.मध्ये शिक्षकांच्या समायोजनात ‘शाळा’ !

By admin | Updated: July 5, 2014 00:37 IST

बीड : जिल्हा परिषदेमध्ये आठवडाभरापूर्वी शिक्षकांची दर्जावाढ व समायोजनाची प्रक्रिया पार पडली. मात्र समुपदेशानुसार झालेल्या समायोजनात ‘शाळा’ झाल्याची बाब आता पुढे येण्यास सुरुवात झाली आहे.

बीड : जिल्हा परिषदेमध्ये आठवडाभरापूर्वी शिक्षकांची दर्जावाढ व समायोजनाची प्रक्रिया पार पडली. मात्र समुपदेशानुसार झालेल्या समायोजनात ‘शाळा’ झाल्याची बाब आता पुढे येण्यास सुरुवात झाली आहे. एकाच जागेवर दोन- दोन शिक्षकांना रूजू आदेश गेल्यामुळे समुपदेशनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महत्वाचे म्हणजे मुख्याध्यापकांची डोकेदुखी वाढली असून रूजू कोणाला करून घ्यायचे याचा पेच निर्माण झाला आहे.बारावी डी.एड. या शैक्षणिक अर्हतेवर सहशिक्षक म्हणून नियुक्त्या मिळालेल्या अनेक शिक्षकांनी पदवी प्राप्त केली. प्राथमिक पदवीधर ही पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त होती. त्यामुळे पदवी प्राप्त करणाऱ्या शिक्षकांना प्राथमिक पदवीधर या पदावर दर्जावाढ देण्यात आली. जवळपास एक हजार शिक्षकांना दर्जावाढ बहाल केल्यानंतर समायोजनाची प्रक्रिया सुरू झाली. तालुकानिहाय समायोजन जि.प.च्या सभागृहात पार पडले. जिल्ह्यात अतिरिक्त असलेल्या १३४ शिक्षकांना समायोजनात प्राधान्य देण्यात आले. मात्र समायोजना दरम्यान मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. समायोजन समुपदेशनानुसार व पारदर्शक पद्धतीने सुरु असल्याचे चित्र निर्माण केले खरे परंतु एका जागेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांचे स्वतंत्र नियुक्ती आदेश गेल्याने समुपदेशन कसे झाले हे स्पष्ट होत आहे.धारूर तालुक्यातील आसरडोह येथे मच्छिंद्र पंडित सोळंके हे शिक्षक जावक क्र. ५१४९ या आदेशाने रूजू होण्यासाठी गेले. तर त्यांच्या आधीच त्याच जागेवर अनिल पांडुरंग सारडा हे जावक क्र.५८४१ नुसार रूजूही झाले. एकाच जागेसाठी दोन रूजू अर्ज गेल्याचे हे प्राथमिक उदाहरण आहे. मात्र बीड, अंबाजोगाई, आष्टी, पाटोदा या तालुक्यांमध्येही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. बीड तालुक्यातील पाली येथे देखील एका शिक्षिकेसह शिक्षकाला स्वतंत्र रूजू आदेश आहेत. अतिरिक्त शिक्षकांचा तिढा कायम दरम्यान, समायोजनात झालेल्या या गोंधळामुळे अतिरिक्त शिक्षकांचा तिढा कायम राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. कारण जिल्ह्यात पूर्वीचेच १३४ अतिरिक्त शिक्षक आहेत. या शिवाय आंतरजिल्हा बदलीने दीडशेहून अधिक शिक्षक जिल्ह्यात आले आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न काय राहील, अशी शक्यता आहे. (प्रतिनिधी)दुरूस्ती करू- जवळेकरयाबाबत सीईओ राजीव जवळेकर म्हणाले, एकाच जागेसाठी दोन अर्ज कसे गेले याची माहिती घेतली जाईल. तसे असेल तर दुरूस्ती करण्यात येईल. मात्र दर्जावाढ, समायोजनामुळे रिक्त जागा भरल्या असून अतिरिक्त शिक्षकांचाही प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली आहे. तालुक्याबाहेरील शिक्षकांना थारा नाही- क्षीरसागरसभापती संदीप क्षीरसागर यांनी सांगितले की, काही आदेश परस्पर निघाले असावेत. तालुक्याबाहेरील शिक्षकांना मुख्याध्यापकांनी रूजू करून घेऊ नये. गटशिक्षणाधिकारी कार्यालयातून आलेल्या आदेशांनाच अधिकृत समजावे. परस्पर आदेश काढल्याचे निदर्शनास आले तर गय नाही, असा इशारा त्यांनी दिला.