अनधिकृत बांधकामांवर ‘संक्रांत’!

By Admin | Updated: December 14, 2014 00:19 IST2014-12-14T00:15:01+5:302014-12-14T00:19:51+5:30

बीड : शहरामधील बेकायदेशीर बांधकामांचा मुद्दा गंभीर बनत चालला आहे. ज्यांनी अनाधिकृत बांधकाम केले आहेत, असे सर्व लोक हे बडे हस्ती आहेत.

'Sanctity' on unauthorized constructions! | अनधिकृत बांधकामांवर ‘संक्रांत’!

अनधिकृत बांधकामांवर ‘संक्रांत’!


बीड : शहरामधील बेकायदेशीर बांधकामांचा मुद्दा गंभीर बनत चालला आहे. ज्यांनी अनाधिकृत बांधकाम केले आहेत, असे सर्व लोक हे बडे हस्ती आहेत. आणि आता कोणाचीही गय केली जाणार नसून या बड्या हस्तींपासूनच गुन्हे दाखल करायला सुरूवात होणार आहे. आठ दिवसांत ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे. नोटीस पाठवूनही गांभीर्याने न घेतल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता अनधिकृत बांधकामधारकांवर ‘संक्रात’ येणार आहे.
मुख्याधिकारी म्हणून श्रीकृष्ण भालसींग रुजू झाले, आणि पालिकेतील वातावरणच ‘स्ट्रीक्ट’ झाले. पुर्वी कर्मचाऱ्यांना ना कोणाचा धाक होता ना दोरा. त्यामुळे पालिकेत सर्व कर्मचाऱ्यांच्या मनावरच कारभार चालतो. त्यामुळे पालिकेचे नियोजन पुर्णत: ढेपाळले होते. वरीष्ठांचे दुर्लक्ष होत असल्यानेच कर्मचारी कार्यालयातून पसार व्हायचे. मात्र आता परिस्थिती पुर्णत: बदलली आहे. कर्मचाऱ्यांनी वेळेवर कार्यालयात येण्याबरोबरच कामांचा आढावा रोजची रोज घेतला जात आहे.
सध्या शहरात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामे करून रस्ते ढापण्याचा प्रयत्न बड्या हस्तींनी केलेला आहे. याचे उत्तम उदाहरणेही पालिकेला दाखवून दिलेले आहेत. पालिकेतील संबंधीत विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात पाहणी न करताच बांधकाम परवाने दिले. ज्या ठिकाणी अनाधिकृतपणे बांधकामे सुरू आहेत, अशांवर कारवाई करण्यासह पालिकेने कठोर उचलेले नव्हते. या सर्व परिस्थितीची आढाव घेऊन ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी अनाधिकृत बांधकाम धारकांना नोटीसा बजावल्या होत्या. त्यामुळे अनाधिकृत बांधकाम धारकांच्या पायाखालची वाळूच सरकली होती. आता पुन्हा एकदा मोठा ‘हाबाडा’ मुख्याधिकारी भालसिंग यांनी दिला आहे. त्यामुळे पालिकेतील अभय देणाऱ्या कर्मचाऱ्यांसह अनाधिकृतपणे बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. (प्रतिनिधी)४
एखाद्यावर नियमाचे उल्लंघन करूनही गुन्हे दाखल करणे म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी मोठे आव्हान असते. कारण प्रत्येकाला बीडमधील ‘दादा’, भैय्या, आण्णा, जिजाचे अभय असते. अधिकारी ज्यावेळेस कारवाया करायला निघतात, त्यावेळेस राजकीय पुढाऱ्यांमार्फत अधिकाऱ्यांवर दबाव आणून कारवाई अडचणी आणल्या जातात. सध्याही अनधिकृतपणे बांधकाम केलेल्या अनेकांना राजकीय पुढाऱ्यांचे अभय आहे. त्यामुळे हे गुन्हे दाखल करणे भालसिंग यांच्यापुढे मोठे आव्हान असणार आहे़

Web Title: 'Sanctity' on unauthorized constructions!