शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये बाॅम्ब हल्ले, हवेत गोळीबार, मी घरी परतलो हे फक्त ‘लक फॅक्टर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 19:59 IST

Russia-Ukraine War: चिकलठाणा विमानतळावर प्रतीक दाखल झाल्यानंतर त्याच्या आईच्या भावना अनावर झाल्या. प्रतीकच्या चेहऱ्यावरून हात फिरवत त्यांनी त्याला डोळे भरून पाहिले

औरंगाबाद : चिकलठाणा विमानतळाच्या इमारतीतील काचेच्या दरवाजातून प्रतीक बाहेर पडतो. त्याला पाहताच त्याच्या आईच्या अश्रूंचा बांध फुटतो, प्रतीकला त्या जवळ घेतात. प्रतीकच्या चेहऱ्यावरील मास्क काढत ही माता लेकराला डोळे भरून पाहते, चेहऱ्यावरून हात फिरवते. पाठोपाठ प्रतीकचे वडीलही गळाभेट घेतात. युक्रेनमधून ( Russia-Ukraine War) सुखरूप परतलेल्या मुलाला भेटतानाचा हा भावनिक प्रसंग बुधवारी अनेकांच्या काळजाला भिडला. युक्रेनमध्ये बाॅम्ब हल्ले, हवेत गोळीबार होत आहे. मी घरी परतलो हे फक्त ‘लक फॅक्टर,’ अशी भावना त्याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

युक्रेनमध्ये ‘एमबीबीएस’च्या तिसऱ्या वर्षात शिकणारा प्रतीक ठाकरे हा बुधवारी औरंगाबादेत परतला. तो परतणार याची माहिती मिळाल्यावर त्याचे वडील अरुण आणि आई विजया ठाकरे या सायंकाळी विमानतळावर गेल्या. त्यांची नजर प्रतीकला शोधत होती. दिल्लीहून इंडिगोच्या विमानाने प्रतीक सात वाजता चिकलठाणा विमानतळावर पोहोचला. त्याला पाहताच अरुण, विजया ठाकरे यांनी त्याच्याकडे धाव घेत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. विजया यांना अश्रू अनावर झाले. प्रतीकने आईचे डोळे पुसले.

‘लोकमत’शी बोलताना प्रतीक म्हणाला, ‘२५ तारखेला पहिल्यांदा हवाई हल्ला झाला. सायरन वाजल्यानंतर इमारतीच्या बंकरमध्ये जावे लागत होते. विद्यापीठाच्या मदतीने बसद्वारे रोमानियाच्या बाॅर्डरपर्यंत पोहोचलाे. रोमानिया येथे दोन दिवस निवारागृहात थांबलो. नंतर भारतीय दूतावासाच्या मदतीने परतलो.’ विमानतळावरील औरंगाबाद सारथी कूल कॅब टॅक्सी असोसिएशनचे पंकज सोनवणे, रवी नाडे, सुरेश राजपूत आदींनी प्रतीकचे स्वागत केले.

तीन दिवस बंकरमध्ये, प्रत्येक इमारतीत बंकरव्हिनित्सिया येथे ३ दिवस बंकरमध्ये काढावे लागले. या ठिकाणी प्रत्येक इमारतीला बंकर आहेत. खाद्यपदार्थ जपून वापरावे लागले. मोबाइलची बॅटरी टिकावी, म्हणून तो बंद करून ठेवला जात होता. माझे बहुतांश मित्र परतले. काही अडकलेले आहेत, असे प्रतीक म्हणाला.

गर्दी नियंत्रणासाठी गोळीबारयुद्धाची परिस्थिती आहे. बाॅम्ब हल्ले होत आहेत; परंतु नागरिकांवर हल्ले होत नाहीत. बॉर्डरवर मोठी गर्दी आहे. प्रत्येकाची बॉर्डर पार करण्यासाठी धडपड आहे. त्यामुळे गर्दी नियंत्रित करण्यासाठी हवेत गोळीबार केला जातो, असे प्रतीक म्हणाला.

माझा प्रतीक आला, इतरांचीही मुले परतावीतमाझा प्रतीक परतला. त्याच्याप्रमाणे प्रत्येक पालकाची मुले परतावीत, हीच प्रार्थना आहे, अशी भावना विजया यांनी व्यक्त केली. मी येत आहे, असा मेसेज आला आणि रिलॅक्स झालो, तो परतला, हा आनंददायी क्षण आहे, असे अरुण ठाकरे म्हणाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाStudentविद्यार्थी