‘एटीएम’ कार्ड चोरून पैसे काढणारा जेरबंद

By Admin | Updated: May 28, 2014 01:15 IST2014-05-28T01:07:06+5:302014-05-28T01:15:41+5:30

औरंगाबाद : एका २२ वर्षीय युवतीचे एटीएम कार्ड चोरून त्याद्वारे परस्पर ४ हजार रुपये काढून घेणार्‍या तरुणास सायबर क्राईम सेलच्या पोलिसांनी जेरबंद केले.

Robbery stole the ATM card | ‘एटीएम’ कार्ड चोरून पैसे काढणारा जेरबंद

‘एटीएम’ कार्ड चोरून पैसे काढणारा जेरबंद

औरंगाबाद : एका २२ वर्षीय युवतीचे एटीएम कार्ड चोरून त्याद्वारे परस्पर ४ हजार रुपये काढून घेणार्‍या तरुणास सायबर क्राईम सेलच्या पोलिसांनी जेरबंद केले. अनिल नारायण नवघरे (२६, रा. हरके लिमगाव, ता. माजलगाव) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. सदरील तरुणी ही इंदिरानगर, गारखेडा परिसरात आपल्या आत्याकडे राहते. ती येथील एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेते. शनिवारी ती महाविद्यालयात जाण्यासाठी घराबाहेर पडली. त्यावेळी अनिल नवघरे हा आडवा आला. या दोघांची जुनी ओळख आहे. ती यापूर्वी माजलगाव तालुक्यात शिक्षणासाठी राहत होती. तेथे अनिल नवघरेही शिकत होता. काल त्याने त्या युवतीच्या पर्समधले तिचे एटीएम कार्ड हिसकावून घेतले. सोबत मोबाईलचे मेमरी कार्डही घेतले. तिने कार्ड परत घेण्याबाबत प्रयत्न केला; पण जास्त हुशारी करशील, तर तुला पळवून नेईन, अशी धमकी देत त्याने तिच्या मनास लज्जा वाटेल, असे कृत्य केले.

Web Title: Robbery stole the ATM card