शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमधील प्रदूषणाचा वाढता इंडेक्स उद्योगांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 19:34 IST

Pollution in Aurangabad पाच वर्षांपूर्वी होती शहरातील ६९.८५ एवढी प्रदूषणाची पातळी 

ठळक मुद्देनव्याने सर्वेक्षण करण्याची मागणी ‘सीएमआयए’च्या प्रतिनिधीचा समावेश असावा

औरंगाबाद : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाच वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणानुसार औरंगाबाद शहरातील प्रदूषण पातळी धोक्याच्या वळणार पोहोचल्याचा निष्कर्ष निघाला असून, ही बाब येथे होणाऱ्या गुंतवणुकीवर तसेच पर्यायाने शहराच्या विकासावरही परिणाम करणारी आहे. तथापि, पर्यावरण विभागाच्या नियमानुसार दर तीन वर्षांनी औद्योगिक शहरातील प्रदूषण पातळी मोजणे अनिवार्य आहे. त्यानुसार या शहरातील प्रदूषण पातळी नव्याने मोजावी व या शहराला रेड झोनच्या यादीत जाण्यापासून वाचवावे, अशी मागणी येथील ‘सीएमआयए’ या उद्योग संघटनेची आहे.

केंद्रीय पर्यावरण नियंत्रण मंडळाने सन २०१६ मध्ये देशभरातील ८८ औद्योगिक शहरांचे सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये महाराष्ट्रातील चंद्रपूर, डोंबिवली, औरंगाबाद, नवी मुंबई व तारापूर या शहरांचा इंडेक्स धोक्याच्या वळणावर, तर नाशिक, चेंबूर व पिंप्री चिंचवड ही तीन शहरे धोक्याच्या पातळीजवळ पोहोचली आहेत, असा निष्कर्ष काढला होता. सर्वेक्षणात औरंगाबादेतील प्रदूषणाची पातळी (कंपर्हेसिंव्ह इन्व्हायर्मेंटल पोल्युशन इंडेक्स) ६९.८५ एवढी होती. एखाद्या उद्योगनगरीची प्रदूषणाची पातळी ७० च्या पुढे पोहोचली असेल, तर ते शहर रेड झोनमध्ये टाकले जाते. अलीकडे येथील औद्योगिक क्षेत्रांमध्ये दर्जेदार प्रक्रिया प्रकल्प उभारलेले आहेत.  रस्ते चांगले झालेले आहेत. बायोवेस्टबद्दल  महापालिकेने काळजी घेतली आहे. या सर्वांचा विचार करून केंद्रीय प्रदूषण मंडळाने नव्याने सर्वेक्षण करून शहराचा ‘सेपी स्कोअर’ निश्चित करावा, अशी मागणी ‘सीएमआयए’चे माजी सचिव शिवप्रसाद जाजू यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

‘सीएमआयए’च्या प्रतिनिधीचा समावेश असावायासंदर्भात ‘सीएमआयए’चे अध्यक्ष कमलेश धूत म्हणाले की, या शहरातील चार-पाच वर्षांपूर्वी निश्चित केलेला प्रदूषणाचा इंडेक्स मोजला तेव्हा एकाही उद्योग संघटनेचा प्रतिनिधी सोबत घेतलेला नव्हता. चुकीच्या पद्धतीने निकष लावले. घाटी हॉस्पिटलमधील रुग्णसंख्या मोजण्यात आली. तेव्हा शहरातील रुग्णांची संख्या न घेता सरसकट दाखल रुग्ण संख्या ग्राह्य धरली. घाटी हॉस्पिटलमध्ये औरंगाबादच्या आजूबाजूच्या अनेक जिल्ह्यांतून रुग्ण येत असतात. त्यामुळे नव्याने सर्वेक्षण करताना ‘सीएमआयए’ या संघटनेचा प्रतिनिधी सोबत घ्यावा, अशी आमची मागणी आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसीpollutionप्रदूषण