छत्रपती संभाजीनगरात वॉकिंग करणाऱ्या क्लासेस चालकास लुटले; रिक्षा गँगच्या मुसक्या आवळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 14:14 IST2026-04-28T14:11:27+5:302026-04-28T14:14:22+5:30

छत्रपती संभाजीनगरात सिडको पोलिसांची कारवाई: ४ आरोपींना ३० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

Rickshaw Gang Arrested for Robbing Coaching Class Owner in Cidco, Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात वॉकिंग करणाऱ्या क्लासेस चालकास लुटले; रिक्षा गँगच्या मुसक्या आवळल्या

छत्रपती संभाजीनगरात वॉकिंग करणाऱ्या क्लासेस चालकास लुटले; रिक्षा गँगच्या मुसक्या आवळल्या

छत्रपती संभाजीनगर : लुटमारीच्या घटना रोखण्यासाठी पोलिस आयुक्तांनी स्थापन केलेले ‘पास २०’ पथक गस्तीवर असतानाच सिडको ठाण्याच्या हद्दीत वॉकिंग करणाऱ्या क्लासेस चालकास रिक्षातील चार जणांनी आडवून लुटल्याचा प्रकार घडला. या प्रकरणात सिडको पोलिसांनी चारही आरोपींना बेड्या ठोकत रिक्षा जप्त केला. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, चौघांना ३० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली.

फिर्यादी क्लासेस चालक प्रदीप पांडुरंग नांदेडकर (४९, रा. गजरातनगर, एन ८, सिडको) हे ओमकार गॅस ते बळीराम पाटील शाळेदरम्यान २३ एप्रिलच्या रात्री १०:३० वाजता वॉकिंग करीत असताना सुरभी हॉटेलसमोर एक रिक्षा (एमएच २०, डीसी ३०७४) त्यांच्या बाजूला येऊन थांबली. त्यातून एक जण उतरला. ‘तुम किधर जा रहे हो, मै आप को छोड देता हू’ असे म्हणून नांदेडकर यांना बळजबरी रिक्षात बसवण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, त्यांनी मी वॉकिंग करीत आहे, मला रिक्षात बसायचे नाही, असे सुनावले. त्यानंतर रिक्षा काही अंतर पुढे नेला. तेथे चौघे उतरून बोलत उभा राहिले. नांदेडकर हे चालत तिथपर्यंत जाताच एक आरोपी समोर आला. त्याने नांदेडकर यांची कॉलर पकडून खर्चासाठी १०० रुपये दे म्हणत खिशात हात घातला. त्याला खिशात काहीही न मिळाल्याने लगेच बोटातील ५ ग्रॅमची अंगठी हिसकावून सर्वांनी रिक्षातून पोबारा केला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सिडको पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला आहे.

रिक्षाच्या क्रमांकावरून चौघांचा शोध
सिडको ठाण्याचे पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाचे सहायक उपनिरीक्षक सुभाष शेवाळे यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली. रिक्षा क्रमांकावरून चालक सफोद्दीन अझरुद्दीन खानला पकडले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने साथीदारांची नावे सांगितली. त्यावरून शेख तौसिफ शेख नासेर, शोएब निजाम शहा, रेहान अखिल देशमुख या तिघांनाही पकडल्याची माहिती सिडको पोलिसांनी सांगितले.

Web Title : छत्रपति संभाजीनगर: वॉकिंग क्लास संचालक लूटा; रिक्शा गिरोह गिरफ्तार।

Web Summary : छत्रपति संभाजीनगर में, एक वॉकिंग क्लास संचालक को एक रिक्शा गिरोह ने लूट लिया। पुलिस ने सभी चार आरोपियों को गिरफ्तार कर लिया और रिक्शा जब्त कर लिया। वे 30 अप्रैल तक पुलिस हिरासत में हैं।

Web Title : Chhatrapati Sambhajinagar: Walking class operator robbed; Rickshaw gang arrested.

Web Summary : In Chhatrapati Sambhajinagar, a walking class operator was robbed by a rickshaw gang. Police arrested all four accused and seized the rickshaw. They are in police custody until April 30.