चंद्रभानू सोनवणेंच्या साहित्य, अध्यापनावर संशोधन व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2016 00:15 IST2016-03-27T23:59:35+5:302016-03-28T00:15:52+5:30

लातूर : साहित्य अध्यापनाचे अवघड कार्य चंद्रभानू सोनवणे यांनी समर्थपणे पेलले आहे़ त्यांच्या साहित्य अध्यापनावर सोनवणे शैक्षणिक संकुलातूनच संशोधन व्हावे,

Research on Chandrabhanu Sonwane's literature and teaching | चंद्रभानू सोनवणेंच्या साहित्य, अध्यापनावर संशोधन व्हावे

चंद्रभानू सोनवणेंच्या साहित्य, अध्यापनावर संशोधन व्हावे


लातूर : साहित्य अध्यापनाचे अवघड कार्य चंद्रभानू सोनवणे यांनी समर्थपणे पेलले आहे़ त्यांच्या साहित्य अध्यापनावर सोनवणे शैक्षणिक संकुलातूनच संशोधन व्हावे, असे मत साहित्यिक तथा डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ़ नागनाथ कोथापल्ले यांनी येथे रविवारी व्यक्त केले़
चंद्रभानू सोनवणे महाविद्यालयात चंद्रभानू सोनवणे गौरव ग्रंथाचे प्रकाशन झाले़ यावेळी ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते़ अध्यक्षस्थानी माजी खा़डॉ़ जनार्दन वाघमारे होते़ यावेळी सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ़ इरेश स्वामी, प्राचार्य डॉ़ बलभीम गोरे, चंद्रभानू सोनवणे यांच्या पत्नी मीरा सोनवणे, संजीव सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी डॉ़ कोथापल्ले म्हणाले, लातूर व सोनवणे महाविद्यालयातून डॉक्टर, अभियंते घडले आहेत़ आपण संशोधनात अद्यापही मागे आहोत़ सोनवणे संकुलातून नवनिर्मिती करणारे संशोधक घडावेत़ चंद्रभानू सोनवणे यांनी साहित्य व अध्यापनात भरीव कार्य केले आहे़ सध्या त्यांचे पुत्र संजीव सोनवणे यांनी आपल्या वडिलांची परंपरा पुढे नेऊन पित्रऋण फेडले आहे़
इरेश स्वामी म्हणाले, सोनवणे गौरव ग्रंथ हा गुरूप्रती व्यक्त झालेली शिष्याची भावना आहे़ प्रास्ताविक डॉ़बलभीम गोरे यांनी केले़ आभार डॉ़ सतिश यादव यांनी मानले़

Web Title: Research on Chandrabhanu Sonwane's literature and teaching