शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराविरोधात बलात्काराचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 23:43 IST

लग्नाचे आमिष दाखवून महिलेला पतीपासून घटस्फोट घ्यायला लावून ‘लिव्ह ईन रिलेशनशिप’मध्ये दोन महिने राहिल्यानंतर लग्नाला नकार देणाºया प्रियकराविरुद्ध पीडितेने बलात्काराचा गुन्हा नोंदविला.

औरंगाबाद : लग्नाचे आमिष दाखवून महिलेला पतीपासून घटस्फोट घ्यायला लावून ‘लिव्ह ईन रिलेशनशिप’मध्ये दोन महिने राहिल्यानंतर लग्नाला नकार देणाºया प्रियकराविरुद्ध पीडितेने बलात्काराचा गुन्हा नोंदविला.अब्दुल सलाम शेख (४०, रा. जिन्सी), असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, जिन्सी परिसरात राहणाºया पीडितेचे नातेवाईक आरोपीच्या इमारतीत भाड्याने राहत होते. त्यामुळे पीडिता ही तेथे जात होती. तिची आणि आरोपी यांच्यात सहा महिन्यांपूर्वी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखविले. मात्र पहिल्या पतीपासून घटस्फोट घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून पीडितेने पतीपासून घटस्फोट घेतला. ४ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत पीडिता आणि आरोपी ‘लिव्ह ईन रिलेशनशिप’मध्ये होते. या काळात ते एकाच घरात राहत होते. तेव्हा त्यांच्यात अनेकदा शारीरिक संबंध आले. १ जूनपासून आरोपीने तिला टाळण्यास सुरुवात केली. पीडितेने त्याच्याकडे लग्नाचा आग्रह धरल्यानंतर तो तिला सोडून गेला. एवढेच नव्हे, तर त्याने लग्नाला स्पष्ट शब्दात नकार दिला आणि फोनवरून पीडितेला धमक्या दिल्या. २६ जुलै रोजी तिने जिन्सी ठाणे गाठून आरोपी अब्दुल सलाम याच्याविरोधात बलात्काराची तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील तपास करीत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी